पळस


           ‘पळसाला पाने तीनच’ अशी म्हण प्रसिद्ध आहे. पळसाची पाने आकाराने बरीच मोठी असतात. म्हणून पळसाच्या पानांच्या पत्रावळी तयार करतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर गरम गरम अन्न वाढले की त्या अन्नाबरोबर पळसाचेही औषधी गुणधर्म पोटात जावेत असा उद्देश आहे. मात्र ती पत्रावळ ताजी असावी. विशेषत: आजच्या आपल्या Disposable च्या युगात प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या हानिकारक वस्तूंमधून सेवन न करता पळसाच्या पानांच्या पत्रावळी, द्रोण वापरावेत.
पळस (पलाश) हा ऊष्ण भूक वाढविणारा आहे. लहान मुलांना जंत झाले असता पळसपापडीचे चूर्ण आणि वावडिंग एकत्र करून घेतले असता सर्व प्रकारचे जंत पडून जातात. प्रमेहावर पळसाच्या पानांचा रस घ्यावा.
          किडनीच्या विकारांवर पळस हा अतिशय उपयुक्त आहे. लघवीला जळजळ होणे, लघवीची उत्पत्ती नीट न होणे, किडनीचे विविध आजार, किडनीला सूज येणे, किडनीत लघवी साठणे, किडनीचा आकार वाढणे, अगदी Chronic Renal Failure पर्यंत सर्व आजारांवर पळसाचा उपयोग शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाला आहे. किडनीच्या विकारांवर पळसाची फुले शिजवून ते पाणी पाजावे. ‘पलाशपुष्पासव’ हे फुलांपासून औषध तयार करतात. हे किडनीच्या विकारांवर अतिशय उपयुक्त आहे. अगदी फुले गरम करून ओटीपोटावर बांधल्यासही अडलेली लघवी साफ होते. मूत्रामार्गाला सूज, मूत्राशायात मूत्र साठणे यावरही याचा उपयोग होतो.
          फ्रॅक्चर झाल्यावर हाडे नीट जुळण्यासाठी पळसाच्या सालीचा उपयोग होतो. संडास साफ न होणे यावर पळसाच्या बीचे चूर्ण घ्यावे.   

Comments

Satish donadkar said…
Sarvach palas he chaglech astat ja
Satish donadkar said…
Sarvch palasachi zade hi yogya astat ka

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड