Posts

Showing posts with the label शिशिरातील काळजी

शिशिरातील काळजी

महाराष्ट्रात सध्या शहरांचा विकास सध्या जोरात सुरु आहे. उंच इमारतिंबरोबरच रस्ते, उड्डाणपूल, यांची कामे जोरात सुरु आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे, वेगवेगळ्या कारणांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. वातावरणात उडणारी धूळ, थंडी, धुक्यामुळे धूलीकण जमिनीलगतच्या वातावरणात जास्त वेळ राहतात. तसेच सध्या शिशिर ऋतू सुरु असल्याने वृक्षांची पानगळ सुरु आहे. ही गळालेली पाने, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जाळला जातो. त्याचाही धूर वातावरणात मिसळतो. हे धुलीकण, धूळ, धूर श्वासोच्छ्वासावाटे फुफ्फुसात, नाकात, जाऊन त्यामुळे विविध आजार होऊ शकतात. रस्त्यावरील खड्डे, खाचखळगे यामुळे मानदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार होऊ शकतात. असलेले आजार वाढतात. धूळ, धूर यामुळे असात्म्यताजन्य विकार बळावतात. सर्दी, शिंका, घसा दुखणे हे आजार होतात. दमा असल्यास दम्याचा वेग तीव्र होतो. लहान मुलांनाही याचा त्रास होतो. डोळ्यात कचरे जाणे, धूळ जाणे, डोळे लाल होणे, पाणी येणे असे डोळ्यांचेही आजार होतात. यावर पुढील काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतील. सर्दी, शिंका, खोकला-   धूर, धुळीमु...