Posts

Showing posts from July, 2022

पावसाळा, तब्येत सांभाळा !!

  वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. तृषार्त धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे. आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रकोपावर ’बस्ती’ हा पंचकर्मांपैकी एक महत्वाचा उपक्रम आयुर्वेदात सांगितलेला आहे. विविध औषधांनी युक्त काढ्यांचा किंवा तेलाचा एनिमा विधिपूर्वक घेणे असे सोप्या भाषेत सांगता येईल. या बस्तीने अनेक संभाव्य रोग