तिळाचे महत्त्व
साधारणपणे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यामध्ये शिशिर ऋतु येतो. या ऋतूत सृष्टीत सर्वत्र रूक्षता असते. झाडांची पाने गळतात, त्याला पानगळ म्हणतात. वातावरणात बोचरी थंडी, गारठा असतो. अशा काळात मकरसंक्रांत येते. भारतीय संस्कृतीत असलेल्या सर्व रुढी, परंपरा ह्या भारतीय हवामानाचा विचार करूनच तयार केलेल्या आहेत. म्हणूनच मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळगू ळ वाटण्याची प्रथा आहे. तीळगूळामध्ये तीळ आणि गूळ हे दोन प्रमुख घटक असतात. तिळाचे आयुर्वेदात फार महत्त्व वर्णन केलेले आहे. तिलोद्भवम तैलम । तिळापासून निघते ते तेल होय. म्हणूनच तेलाला ’तेल’ हे नाव प्राप्त झाले. तेलात तीळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. शिशिर ऋतूत शरीरातील स्नेह कमी झालेला असतो, रुक्षता वाढलेली असते. अशा वेळी तिळाचे नियमित सेवन करावे. तीळ हे मधुर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टीक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत. सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. हिवाळ्यात तिळतेलाने अंगाला अभ्यंग करावे. त्यामुळे त्वचा मऊ,...