Posts

Showing posts from September, 2022

अगस्ती दर्शन

  मंडळी, पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये असलेले काही उल्लेख आपल्याला कळत नाही. उगीच काही तरी दिले असेल म्हणून आपण दुर्लक्ष करतो. जाणकार व्यक्तीने समजावून सांगितले तर ठीक, नाहीतर आपण लक्ष देत नाही. आता हेच पहा ना ! ९ ऑगस्ट रोजी अगस्ती दर्शन असा उल्लेख पंचांगात आणि कॅलेंडरमध्ये आहे. म्हणजे काय, तर आकाशात अगस्ती ता-याचा उदय या दिवशी झाला. अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो. अर्थात ही कालगणना प्राचीन कालापासून चालत आली आहे. सध्या ऋतूमान बदलल्यामुळे अगस्ती उदय झाला म्हणजे शरद ऋतु सुरु झाला असे मात्र नाही. असो. पण याचा आरोग्याशी, आयुर्वेदाशी काय संबंध ? अगस्ती ता-याच्या उदयाने पाणी शुद्ध होते असा आयुर्वेदात उल्लेख आहे. अगस्ती ता-याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते. असे पाणी सर्वांनी पिण्यास योग्य आहे. इतकेच नव्हे तर अगस्तीच्या उदयाने सर्व व