कडुनिंब
भारतीय संस्कृतीच्या नवीन वर्षाची सुरुवात कडुनिंबाच्या सेवनाने होते. नवीन वर्षाचे स्वागत तोंड गोड करून न करता कडु तोंड करण्याची प्रथा का आहे ? शरीरात संचित झालेल्या कफाचे शमन व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबा ची कोवळी पाने, फुले, गूळ, आमसोल, जिरे, ओवा, सैंधव यांची चटणी करून सकाळी अनशेपोटी खाण्याची प्रथा आहे. वर्षातून एकदा तरी ही वनस्पती खाल्ली जावी हा त्यामागील उद्देश आहे. केवळ गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचे सेवन न करता वसंत ऋतूत नियमित सेवन करावे. गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी सजविण्यासाठी निंबाच्या डहाळ्या बांधतात. कडुनिंबाच्या झाडामुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. निंबाची वाळलेली पाने जाळली असता डासांचे प्रमाण कमी होते. निंबाचे झाड खूप वर्षे टिकते. त्यामुळे वातावरण निरोगी राहून सावलीही दाट मिळते. हे झाड विशेष करून भारतीय उपखंडातच आढळते. झाड जुने झाल्यावर त्याच्या खोडाला सुगंधी वास येतो. त्वचारोगांवर कडुनिम्बाचा उपयोग सर्वांना माहिती आहेच...