नारळ
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळास फार महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळाने होते. . ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. शहाळ्यातून निघणाऱ्या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात. नारळाशिवाय पूजेची सुरुवात होत नाही. सुवासिनीची कोठेही जाताना आनंद प्रसंगी किंवा मंगल प्रसंगी नारळाने ओटी भरणे शुभ मानले जाते. नारळाचे संपूर्ण झाड उपयुक्त आहे. नारळाला कल्पवृक्ष मानले आहे. प्रेमाने (?) रवानगी करायची असेल तरी नारळ दिला जातो. नारळाची भेट, नारळाचा प्रसाद हे प्रेमाचे द्योतक आहे.
नारळाचे खोबरे, तेल, नारळाचे दूध, नारळातील पाणी याचे खूप उपयोग आहेत. नारळाच्या करवंटीचाही उपयोग होतो. पानांपासून खराटा, झाडू करतात.
माड किंवा श्रीफळ हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वृक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुऱ्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काहीना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात.
नारळ पचायला थोडे जड आहे, तसेच स्निग्ध, थंड, बलदायक, कफवर्धक, गोड, तहान व पित्तनाशक आहे. कोणत्याही कारणाने अवयव मुरगळला असेल, स्नायू दुखावला असेल तर नारळाचा किस, हळद यांचे मिश्रण गरम करून शेकल्यास ठणका, सूज याला आराम पडतो. नारू, गजकर्ण यावरही याचा उपयोग होतो. नारळाचे तेल केसवर्धक, त्वचा मऊ करणारे आहे. त्वचेच्या सुरकुत्या, डाग, यावर ओल्या खोब-याचे ताजे तेल लावावे. पित्ताशयाच्या समस्या ओळखण्यासाठी नारळ विशेषतः उपयुक्त आहे. एका वाडग्यात कच्च्या नारळाचे दाणे, रस आणि पांढरे चंदन पावडर एकत्र करा. हे मिश्रण १० ग्रॅम रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी सर्वप्रथम ते फिल्टर करून रिकाम्या पोटी सेवन करणे चांगले.
अपचन, मूळव्याध यावरही उपयोग होतो. ओले खोबरे अतिशय पौष्टीक, बलदायक, शुक्रवर्धक आहे. अशक्त लोकांना ओले खोबरे चावून खाण्यास द्यावे.
नारळामध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. नारळात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि परजीवी विरोधी क्षमता मुबलक प्रमाणात असते. परिणामी, शरीरातील संसर्ग नाहीसा होतो, आणि शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता सुधारते.
अलिकडच्या वर्षांत नारळाचे तेल केवळ सौंदर्य उद्योगातच नव्हे तर खाद्य उद्योगातही चर्चेत आहे. भारतात खोबरेल तेलाचा वापर नवीन नाही, विशेषतः दक्षिण भारतात. तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश यांसारख्या दक्षिणेकडील राज्यांतील मूळ लोक प्राचीन काळापासून खोबरेल तेलाचा वापर मुख्य खाद्यतेल म्हणून करतात. नारळ तेल हे क्रोहनच्या आजारावर एक उपचार आहे. रुग्णाला आतड्यांमध्ये जळजळ, अतिसार, स्टूलमध्ये रक्त, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे जाणवतात. नारळ तेल अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये एक लोकप्रिय घटक आहे आणि जगभरातील अनेक सौंदर्य जागरूक महिलांसाठी मुख्य आहे.
देवाच्या करणीचे नारळातील पाणी मधुर, शीत आहे. याने भूक वाढते आणि लघवीचे दोष कमी होतात. नारळाचे पाणी विविध प्रकारचे पोषक, तसेच कॅलरीज प्रदान करते आणि ते सहज पचण्याजोगे असते. त्याचे पाणी संपूर्ण शरीरात ग्लुकोजचे वाहतूक करते.
शहाळे
याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. उचकी, वांती यावर शहाळ्याचे पाणी व वेलदोडे एकत्र दिल्यास उपयोग होतो. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या
व्यक्तींना
विशेष
उपयोगी
समजले
जाते.
कॉलरा उलट्या थांबत नसल्यास, रुग्णाला लगेच नारळ पाणी द्यावे. शरीरातील जल कमी झाल्यास नारळ पाणी द्यावे. करवंटी जाळून त्याचे चूर्ण व मध घेतल्यास भूक लागते. करवंटीच्या राखेत सैंधव व कापूर घालून दात घासल्यास दात व हिरड्या बळकट होतात. अशा या कल्पवृक्षाचे स्मरण रहावे म्हणून आपण नारळी पौर्णिमा साजरी करतो.
© लेखक- डॉ. गोपाल मेघ:श्याम सावकार, आयुर्वेद, पंचकर्म,
योग तज्ञ
श्री ब्रह्मगिरी, हॉटेल साई पॅलेसमागे, चेतनानगर, नाशिक,
मोबाईल- 8149988904, ईमेल- gsawkar@gmail.com
Comments