Posts

Showing posts with the label हळद

हळद

चंपाषष्ठी अर्थात खंडोबाच्या उत्सवाच्या निमित्ताने हळदीचा भंडारा उधळला जातो. मणिमल्ल दैत्यांशी कडेपठारावर लढाई खेळलेल्या खंडोबाने हळदीला आपल्या आवडत्या द्रव्यात स्थान दिले ह्यात काय नवल ?  झालेल्या जखमांमधील रक्तस्राव थांबवून जखमा भरून आणणे यात हळद अत्यंत श्रेष्ठ आहे. हळदीमुळे जखमा तर व्यवस्थित भरतातच शिवाय जखमेचे व्रणही शिल्लक रहात नाहीत. 'पी हळद आणि हो गोरी' अशी म्हण तिरकस अर्थाने असली तरी त्वचेचा रंग उजळण्यात हळद सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच लग्नात आधी हळद लावण्याची प्रथा आहे. हळद अंगाला लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. त्वचा  सतेज आणि कांतिमान होते. हळदीच्या अंगी रक्तशुद्धीकरणाचा मोठा गुणधर्म आहे. हळद रक्तवर्धक  आहे. खाज, खरूज, त्वचेवर पित्त उठणे यासारख्या त्वचारोगांवर पोटातून हळद घ्यावी आणि बाहेरूनही हळद लावावी.  मधुमेहातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हळद आणि  आवळकाठी चूर्ण...