हळद
चंपाषष्ठी अर्थात खंडोबाच्या उत्सवाच्या निमित्ताने हळदीचा भंडारा उधळला जातो. मणिमल्ल दैत्यांशी कडेपठारावर लढाई खेळलेल्या खंडोबाने हळदीला आपल्या आवडत्या द्रव्यात स्थान दिले ह्यात काय नवल ? झालेल्या जखमांमधील रक्तस्राव थांबवून जखमा भरून आणणे यात हळद अत्यंत श्रेष्ठ आहे. हळदीमुळे जखमा तर व्यवस्थित भरतातच शिवाय जखमेचे व्रणही शिल्लक रहात नाहीत.
'पी हळद आणि हो गोरी' अशी म्हण तिरकस अर्थाने असली तरी त्वचेचा रंग उजळण्यात हळद सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच लग्नात आधी हळद लावण्याची प्रथा आहे. हळद अंगाला लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. त्वचा सतेज आणि कांतिमान होते. हळदीच्या अंगी रक्तशुद्धीकरणाचा मोठा गुणधर्म आहे. हळद रक्तवर्धक आहे. खाज, खरूज, त्वचेवर पित्त उठणे यासारख्या त्वचारोगांवर पोटातून हळद घ्यावी आणि बाहेरूनही हळद लावावी.
मधुमेहातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हळद आणि आवळकाठी चूर्ण एकत्र करून घ्यावे. आवळ्याच्या माहितीत हे आपण पाहिलेच.
सर्दी, खोकला यावर हळदीचा चांगला उपयोग होतो. हळद कफघ्न आहे. काही जणांना दुध घेतल्यामुळे कफ होतो, त्यावर दूध आणि हळद एकत्र करून घेतल्यास त्रास होत नाही. तसेच आवाज बसणे, घसा दुखणे यावरही दूध आणि हळद एकत्र करून घ्यावी.
डोळे येणे, डोळ्यांची आग, लाली, पापण्यांना खाज, डोळ्यातून पाणी येणे यावर हळदीच्या काढ्याने डोळे धुवावेत.
तारुण्यपिटीका, चेहऱ्यावरील काळे डाग, त्वचेचे विकार यावर हळद दुधात भिजवून चेहऱ्याला लावावी.
प्रसुतीनंतर गर्भाशय आणि स्तन्य (अंगावरील दूध) यांची शुद्धी व्हावी म्हणून हळदीचा उपयोग होतो.
हळदीच्या अंगी वेदना कमी करण्याचेही गुण आहेत. मार लागल्यावर हळद आणि गूळ खायला देतात.
कावीळ झाल्यावर हळद खाऊ नये हा फार मोठ्ठा गैरसमज आहे. कावीळ झाल्यावर शरीर पिवळे होते म्हणून पिवळी हळद का खा ? हा मोठ्ठा गैरसमज आहे. तर कावीळ झाल्यावर हळदीचा चांगला उपयोग होतो.
अशा या बहुगुणी हळदीला हळदी कुन्कू या सौभाग्य द्रव्यात अग्रस्थान मिळाले आहे.
डा. माशेलकर सरांनी हळदीचे पेटन्ट आपल्याकडे खेचून आणले, हा इतिहास आपल्याला माहितीच आहे. अश्या बहुगुणी हळदीचा नित्य वापर केल्याने विजयाचे समाधान नक्कीच लाभेल.

Comments