Posts

Showing posts with the label औदुंबर (उंबर)

औदुंबर (उंबर)

     भगवान दत्तात्रेयांना औदुम्बराचे झाड अतिशय प्रिय आहे. औदुम्बराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचा वास असतो. दत्तजयन्तीच्या वेळी आपण औदुम्बराची पूजा करतो, त्यानिमित्ताने आपण त्याच्या अंगी असणाया गुणांची माहिती घेऊ या.     पुराणामध्येही अशी एक कथा आढळते की नरसिंव्हाने जेव्हा हिरण्यकश्यपू या राक्षसाचा पोट फाडून वध केला तेव्हा त्याच्या हाताच्या नखान्ची खूप आग व्हायला लागली. त्यावेळी त्याने आपली नखे उंबराच्या झाडात खुपसली, तेव्हा ती आग शान्त झाली. त्यातील कथेचा भाग सोडला तरी उंबर हे अतिशय थंड आहे, हे आपल्या लक्षात येते.     उंबराच्या झाडाजवळ जमिनीखाली पाणी असते, असे म्हणतात.  उंबराची साल, फळ, चीक, रस, पाने यांचा औषधात वापर करतात.     उंबर हे पित्तशामक, तसेच तहान भागविणारे आहे. अम्लपित्तावर उंबराची पिकलेली फळे साखरेबरोबर देतात. उष्णतेने अंगाची आग होत असल्यास सालीचे चूर्ण किंवा काढ्याचा उपयोग होतो. रक्तपित्त नावाच्या आजारात याचा चांगला उपयोग होतो. अंगावरून जास्त जाणे या स्त्रियांच्या विकारात फळे, साली...