बदाम
सुकामेवा म्हणून बदाम प्रसिद्ध आहेत. बदाम हे अतिशय पौष्टीक आणि शक्तीवर्धक आहेत. बदामाचे तेल सुद्धा निघते. हे तेल सौंदर्यप्रसाधनांमध्ये सौंदर्यवृध्दीसाठी, त्वचा कांतिमान होण्यासाठी वापरतात. हिवाळ्यात पौष्टीक खाद्य म्हणून बदामाचा शिरा खातात. डोकेदुखी, डोके जड होणे, अर्धशिशी यावर बदाम्याच्या शि-याचा खूप चांगला उपयोग होतो. आयुर्वेदानुसार बदामामुळे मज्जाधातूची वृध्दी होते. बदाम हे बुध्दीच्या वाढीसाठी खातात. बुध्दीची धारणाशक्ती वाढावी, वाचलेले किंवा ऎकलेले लवकर लक्षात यावे, एकदा लक्षात राहिलेले जास्त काळ लक्षात रहावे, जास्त माहिती लक्षात ठेवण्याचे क्षमता वाढावी यासाठी बदामाचा खूप उपयोग होतो. बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. तसेच प्रथिने आणि स्निग्ध पदार्थही असतात. म्हणून हिवाळ्यात बदामाचे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. डिंकाच्या लाडूत बदाम घालतात. मात्र बदाम ऊष्ण व ज...