Posts

Showing posts with the label द्राक्षे

द्राक्षे

        आमच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे अतिशय प्रसिद्ध. महाशिवरात्रीनंतर थोडे ऊन वाढायला लागले की द्राक्षात गोडी उतरते. द्राक्षात पाण्याचे प्रमाण जास्त असते. आयुर्वेदानुसार द्राक्षे ही रस धातूचे पोषण करणारी आहेत. त्वचा मुलायम, कांतीमान (त्वचेला 'ग्लो' येणे) होण्यासाठी द्राक्षांचे नियमित सेवन करावे. विशेषत: उन्हाळ्यात उन्हाने त्वचा कोरडी, सुरकुतलेली होते त्यावर द्राक्षासारख्या रसदार फळांचा उपयोग होतो.     खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी तहान न भागणे यावर द्राक्षे खावीत. अम्लपित्तावर गोड द्राक्षांचा चांगला उपयोग होतो. द्राक्षे खाण्याआधी ती स्वच्छ धुवून घ्यावीत. कारण त्यावर किटकनाशकांची भरपूर फवारणी झालेली असते. कच्ची, आंबट द्राक्षे खाऊ नयेत.     द्राक्षे वेगवेगळ्या प्रकारे सुकविल्यानंतर त्यापासून किसमिस, बेदाणे, मनुका तयार करतात. काळ्या मनुका आयुर्वेदाने श्रेष्ठ मानल्या आहेत. त्या पित्तशामक, अनुलोमक, थंड असतात. शरीरातील रक्तधातूच्या वाढीसाठी त्यांचे सेवन करावे. रक्तपित्त, त्वचेखालील रक्तस्रावाचा एक आजार यावरही मनुकां...