Posts

Hand Foot Mouth आजार अर्थात टोमॅटो फ्ल्यु

  मंडळी , सध्या लहान मुलांमध्ये अंगावर विशेषतः हात आणि पाय यावर लाल पुळ्या येणे , त्यातून पाणी येणे , खाज येणे अशी लक्षणे असलेला आजार साथीच्या स्वरूपात पसरलेला आढळतो आहे. सध्या ' मंकी पॉक्स ' या आजाराचा बोलबाला असल्याने अनेक पालक घाबरून जाताहेत. पण पालकांनो , काळजी करू नका. या आजाराचा आणि मंकी पॉक्स या आजाराचा सबंध नाही. मंकी पॉक्स हा आजार भारतात पसरलेला नाही. सध्या लहान मुलांमध्ये दिसणारा हा आजार 'HAND, FOOT, MOUTH (HFMD)' या आजाराशी साधर्म्य दाखविणारा आजार आहे. खूप पाउस , कोंदट वातावरण , त्यानंतर लगेच कडक उन यामुळे असे आजार पसरतात. आयुर्वेदात वर्णन केलेले शीतला , रोमान्तिका आजारांच्या जातकुळीतील हाही आजार आहे. हा लहान मुलांमध्ये संपर्काने पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. यामुळे अंगावर लाल पुळ्या , त्यातून पाणी येणे , खाज येणे , अंग दुखणे , ताप येणे , काहींमध्ये भूक कमी होणे , घसा दुखणे , सर्दी , डोळे लाल होणे अशीही लक्षणे आढळतात. हा SELF LIMITING आजार आहे. हा १० ते १२ दिवसात बरा होतो. त्यामुळे घाबरू नका. सर्वप्रथम प्रतिबंधात्मक उपचार करावेत. आजार झालेल्या मुलांना ८

पावसाळा, तब्येत सांभाळा !!

  वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. तृषार्त धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे. आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रकोपावर ’बस्ती’ हा पंचकर्मांपैकी एक महत्वाचा उपक्रम आयुर्वेदात सांगितलेला आहे. विविध औषधांनी युक्त काढ्यांचा किंवा तेलाचा एनिमा विधिपूर्वक घेणे असे सोप्या भाषेत सांगता येईल. या बस्तीने अनेक संभाव्य रोग

शिशिर ॠतूतील काळजी

  महाराष्ट्रात सध्या शहरांचा विकास सध्या जोरात सुरु आहे. उंच इमारतिंबरोबरच रस्ते, उड्डाणपूल, यांची कामे जोरात सुरु आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे, वेगवेगळ्या कारणांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. वातावरणात उडणारी धूळ, थंडी, धुक्यामुळे धूलीकण जमिनीलगतच्या वातावरणात जास्त वेळ राहतात. तसेच सध्या शिशिर ऋतू सुरु असल्याने वृक्षांची पानगळ सुरु आहे. ही गळालेली पाने, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जाळला जातो. त्याचाही धूर वातावरणात मिसळतो. हे धुलीकण, धूळ, धूर श्वासोच्छ्वासावाटे फुफ्फुसात, नाकात, जाऊन त्यामुळे विविध आजार होऊ शकतात. रस्त्यावरील खड्डे, खाचखळगे यामुळे मानदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार होऊ शकतात. असलेले आजार वाढतात. धूळ, धूर यामुळे असात्म्यताजन्य विकार बळावतात. सर्दी, शिंका, घसा दुखणे हे आजार होतात. दमा असल्यास दम्याचा वेग तीव्र होतो. लहान मुलांनाही याचा त्रास होतो. डोळ्यात कचरे जाणे, धूळ जाणे, डोळे लाल होणे, पाणी येणे असे डोळ्यांचेही आजार होतात. यावर पुढील काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतील. सर्दी, शिंका, खोकला-   धूर, धुळीमुळे पुष्क