Posts

उपयुक्त वड

       भारतीय संस्कृतीने वर्षातील एका दिवसालाच याचे नाव दिले आहे, ’वटपौर्णिमा’. वडाचा फार मोठा वृक्ष असतो आणि खूप वर्षे टिकतो.  दीर्घायुष्याचे प्रतिक म्हणून वडाचे झाड मानले जाते. झाडाचा बुंधा मोठा डेरेदार असल्याने झाडाला पार बांधतात. वडाला नित्य नव्या पारंब्या फुटत असतात. वड, पिंपळ, औदुंबर हे वृक्ष हिंदूंनी फार पूजनीय मानले आहेत. या झाडांभोवती प्रदक्षिणा घालण्याचा स्त्री, पुरुषांचा प्रघात असे. विशेषत: स्त्रिया तर वडाला नित्य प्रदक्षिणा घालत असत. स्वयंपाक घरातील स्त्रिया घराबाहेर पडून त्यांनी प्रदक्षिणा मारल्यामुळे शरीराला व्यायाम होऊन बाहेरील मोकळी, ताजी हवा मिळण्याची ती सोय असावी. विशेषत: आजच्या प्रदुषणयुक्त आणि टी.व्ही.मय युगात तर याची जास्तच गरज आहे.          ईच्छित संततीप्राप्तीसाठी ’पुसंवन’ नावाचा विधी आयुर्वेदात वर्णन केला आहे. त्यामध्ये वडाच्या कोवळ्या कोंबांचा वापर करतात. मुलगा असो की मुलगी, जन्मणारे बालक सुदृढ, निरोगी जन्माला यावे यासाठी आयुर्वेदात खूप मार्गदर्शन आहे, त्याविषयी नंतर पाहू.   ...

नैसर्गिक शीतपेयांचा आस्वाद घ्या !

    उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जशजशी वाढू लागते, तसतसे थंडपेयांच्या दुकानाकडे आपले पाय वळू लागतात. दूरदर्शनवरून होणारा जाहिरातींचा मारा आणि त्यांची चटकदार चव यामुळे कृत्रिम शीतपेयांची आर्डर आपोआप दिली जाते. पण प्रमाणाबाहेर स्ट्राँग पेय आणि साखर यामुळे कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने आरोग्य बिघडते. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपाची शीतपेये घेतल्यास ती पोषण करणारी, थंड, शरीराची ऊष्णता कमी करणारी असतात.     पाणी-   पाणी ही सर्वोत्कृष्ट नैसर्गिक शीतपेय आहे. ते खरे जीवन आहे. आयुर्वेदात पाण्याचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत. त्याविषयी नंतर कधी तरी. पाणी हे थंड आहे. फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातले गार केलेले पाणी चांगले. उन्हाळ्यात पाणी उकळून गार करून प्यावे. फील्टरचे पाणी जरी शुद्ध असले तरी पाणी उकळल्याने ते गुणांनी हलके होते. फ्रीजमधील थंड पाण्यामुळे भूक कमी होऊन पोटात जडपणा वाढतो, उलट माठाचे पाणी तुलनेने हलके असते. वाळा, चन्दन, मोगरा, गुलाब यासारख्या सुगंधीत द्रव्यांनी सुगंधीत करून प्यावे.     शहाळ्याचे, नारळाचे पाणीही तहान भाग...

केळी

       जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीची झाडे बहुतकरून सगळीकडे होतात. काहींच्या मामांच्या मालकीच्या केळीच्या बागाही असतील. असो. केळ्यांचे वेफर्स हा लोकप्रिय पदार्थ आहे. कच्च्या केळ्यांची, केळफुलांची भाजी करतात. केळ्यांची कोशिम्बिरही करतात. काही केळीच्या प्रकारांमध्ये केळाच्या गाभ्यात बिया असतात. रानकेळीमधल्या बिया 'देवी' या विकारावर अतिशय उपयुक्त आहेत. केळापासून 'कदलीक्षार' तयार करतात. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळे हा गोड, थंड, कफवर्धक, बलवर्धक पदार्थ आहे. केळे पचायला जड आहे. खूप भूक लागली असताना नुसती केळी खाल्ली असता उत्साही, तरतरीत वाटते. रानकेळी चे बी पिसाळलेल्या कुत्र्याच्या विषावर उपयुक्त आहे, अशी वृद्ध वैद्य परंपरेत दिलेले आहे. खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे, यावर केळीचे सेवन करावे. मात्र दूध आणि केळी एकत्र करून खाऊ नये, ते विरुद्धान्न आहे. विरुद्धान्न सेवन केल्यामुळे अनेक विकार होतात. केळी किंवा कोणतेही फळ आणि दूध यांचे शिकरण करून खाऊ नये. केळीच्या पानावर भोजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्याने ...