चंपाषष्ठी अर्थात खंडोबाच्या उत्सवाच्या निमित्ताने हळदीचा भंडारा उधळला जातो. मणिमल्ल दैत्यांशी कडेपठारावर लढाई खेळलेल्या खंडोबाने हळदीला आपल्या आवडत्या द्रव्यात स्थान दिले ह्यात काय नवल ? झालेल्या जखमांमधील रक्तस्राव थांबवून जखमा भरून आणणे यात हळद अत्यंत श्रेष्ठ आहे. हळदीमुळे जखमा तर व्यवस्थित भरतातच शिवाय जखमेचे व्रणही शिल्लक रहात नाहीत. 'पी हळद आणि हो गोरी' अशी म्हण तिरकस अर्थाने असली तरी त्वचेचा रंग उजळण्यात हळद सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच लग्नात आधी हळद लावण्याची प्रथा आहे. हळद अंगाला लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. त्वचा सतेज आणि कांतिमान होते. हळदीच्या अंगी रक्तशुद्धीकरणाचा मोठा गुणधर्म आहे. हळद रक्तवर्धक आहे. खाज, खरूज, त्वचेवर पित्त उठणे यासारख्या त्वचारोगांवर पोटातून हळद घ्यावी आणि बाहेरूनही हळद लावावी. मधुमेहातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हळद आणि आवळकाठी चूर्ण...
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अशी म्हण प्रसिद्ध आहे. बोरी बाभळी ह्या रानोमाळ उगवणारया काटेरी वनस्पती आहेत. बाभळीचा पाला हा शेळ्या- मेंढ्यांचे आवडते खाद्य आहे. बाभूळ ही तुरट रसाची आहे. कडू, तुरट रसाच्या द्रव्यांनी दात घासल्याने दातांचे आरोग्य चांगले रहाते. बाभळीच्या कोवळ्या काड्यांनी दात घासावेत. दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले रहाते. दातांच्या आणि हिरड्यांच्या विकारांवर बाभळीच्या काड्या, साल याच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. गुळण्या कराव्यात म्हणजे तोंडात काढा घेऊन फक्त खळखळ गुळण्या असे नव्हे तर, गुळण्या करण्यापूर्वी तो काढा तोंडात १० ते २० सेकंद धरून ठेवावा. त्यामुळे जास्त चांगला परिणाम मिळतो. तोंड येणे, तोंडात जखम, हिरड्यांचे, दातांचे विकार यावर खूप चांगला उपयोग होतो. डिं काचे लाडू सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या लाडूंमध्ये जो डिंक वापरतात तो बाभळीचा डिंक असतो. तांबडा-पांढरा अशा रं...
भारतीय संस्कृतीने वर्षातील एका दिवसालाच याचे नाव दिले आहे, ’वटपौर्णिमा’. वडाचा फार मोठा वृक्ष असतो आणि खूप वर्षे टिकतो. दीर्घायुष्याचे प्रतिक म्हणून वडाचे झाड मानले जाते. झाडाचा बुंधा मोठा डेरेदार असल्याने झाडाला पार बांधतात. वडाला नित्य नव्या पारंब्या फुटत असतात. वड, पिंपळ, औदुंबर हे वृक्ष हिंदूंनी फार पूजनीय मानले आहेत. या झाडांभोवती प्रदक्षिणा घालण्याचा स्त्री, पुरुषांचा प्रघात असे. विशेषत: स्त्रिया तर वडाला नित्य प्रदक्षिणा घालत असत. स्वयंपाक घरातील स्त्रिया घराबाहेर पडून त्यांनी प्रदक्षिणा मारल्यामुळे शरीराला व्यायाम होऊन बाहेरील मोकळी, ताजी हवा मिळण्याची ती सोय असावी. विशेषत: आजच्या प्रदुषणयुक्त आणि टी.व्ही.मय युगात तर याची जास्तच गरज आहे. ईच्छित संततीप्राप्तीसाठी ’पुसंवन’ नावाचा विधी आयुर्वेदात वर्णन केला आहे. त्यामध्ये वडाच्या कोवळ्या कोंबांचा वापर करतात. मुलगा असो की मुलगी, जन्मणारे बालक सुदृढ, निरोगी जन्माला यावे यासाठी आयुर्वेदात खूप मार्गदर्शन आहे, त्याविषयी नंतर पाहू. ...
Comments