बदाम



          सुकामेवा म्हणून  बदाम प्रसिध्द आहेत. बदाम हे अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक आहेत. बदामाचे तेल सुद्धा निघते. हे तेल सौंदर्य प्रसाधनामध्ये सौन्दर्यवृद्धीसाठी, त्वचा कांतिमान होण्यासाठी वापरतात. हिवाळ्यात पौष्टिक खाद्य म्हणून बदामाचा शिरा खातात. डोकेदुखी, डोके जड होणे, अर्धशिशीवर बदामाचा खूप उपयोग होतो. 
          आयुर्वेदानुसार बदामामुळे मज्जाधातूची वृध्दी होते. बदाम हे बुध्दीच्या वाढीसाठी खातात. बुध्दीची धारणाशक्ती वाढावी, वाचलेले लवकर लक्षात यावे, वाचलेले दीर्घकाळ लक्षात रहावे यासाठी बदाम खावेत. 
          बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. तसेच प्रथिने, स्निग्ध पदार्थही असतात. बदामा पासून भरपूर कॅलरीज मिळतात. बदाम उष्ण गुणाचे असल्यामुळे एकाच वेळी खूप बदामाचे सेवन करू नये.

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड