लसूण
मंडळी, खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर आपल्याला
भेटतोय. कार्यबाहुल्यामुळे उशीर झाला याबद्दल क्षमस्व.
लसूणामध्ये लवण रस वगळता उरलेले पाचही रस आहेत.
लसणाने जिभेला चव येऊन भूकही उत्तम लागते. म्हणून जेवणात लसणाचा वापर करतात.
विशेषतः पावसाळ्यात लसणाचा भरपूर वापर करावा. पोटात वाट साठणे, पोट गडगडणे, पोट
दुखणे यावर लसूण खाऊन वर कोमट पाणी प्यावे. सर्दी, खोकला, नाक वाहणे, शिंका येणे,
खोकला यावर गरम कडकडीत फुटाणे व कच्चा लसूण चावून खावा. मात्र त्यावर पाणी पिऊ
नये. कानात आवाज येणे, कान दुखणे यावर लसूण व तीळ तेलात कडकडून ते तेल कोमट
झाल्यावर नित्य कानात घालावे. मात्र कान फुटला असताना तेल अजिबात घालू नये. रक्तातील
कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण लसणाने कमी होते, हे सिद्ध झालेले आहे. हृदयरोग
असणारे, रक्तवाहिनीत अडथळा असणारे, कोलेस्टेरॉल जास्त असणारे व्यक्ती यांनी कच्चा
लसूण खावा. सांधे सुजणे, दुखणे यावर लसणाचा उपयोग होतो. लसूण बुद्धिवर्धक आहे.
लसूण नित्य खाण्याने बुद्धी तरतरीत व तल्लख होते. लहान मुलांना लसूण दिल्याने
पोटातील जंत मरतात. मुरडा येऊन आव पडत असल्यास लसूण खावा. अर्धे डोके दुखत असल्यास
लसणाचा रस नाकात सोडावा.
Comments