जिरे
आपल्या रोजच्या
स्वयंपाकघरातील जिरे हा पदार्थ औषधीदृष्ट्या खूप उपयुक्त आहे. जिरे हे उत्तम पाचक,
रुचिकर, हलके आहेत. भूक न लागणे, अजीर्ण होणे, यावर जिर्याचे चूर्ण कोमट
पाण्याबरोबर घ्यावे. मुखरोग, जिभेला फोड येणे, तोंडात चट्टे पडणे या व्याधींवर
जिरे बारीक कुटून पाण्यात भिजवून नंतर त्या गाळलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
प्रसुतीनंतर अंगावर दूध चांगले येण्यासाठी जिर्याचे चूर्ण आणि गूळ एकत्र करून
खावे. तोंड आले असल्यास जिरे चघळावेत. कडू जिर्याचा धूर केला असता डास, चिलटे,
किडे पळून जातात. श्वेतप्रदर, रक्तप्रदर या स्त्रियांच्या व्याधींवर जिरे आणि
खडीसाखर एकत्र करून खावी. अंगात उष्णता असल्यास जिरेपूड रोज खावी. सारखी आव पडत
असल्यास जिर्याचे चूर्ण घ्यावे.
अंग खाजत असेल, अॅलर्जीमुळे अंगावर लाल पुरळ
आले असेल तर जिरे रात्री गरम पाण्यातून घ्यावेत. पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून,
अन्नपचन व्यवस्थित व्हावे म्हणून जिरे घालून उकळून गार केलेले पाणी नियमित प्यावे.
दक्षिण भारतात असे जिरेयुक्त गरम पाणी भोजनापूर्वी पिण्यास देण्याची प्रथा आहे.
Comments