माका


                   शरद ऋतूत नदी, ओढ्याच्या काठी, पाणथळ जागी भरपूर माका उगवलेला दिसतो. पितृपक्षात श्राद्धाच्या पिंडांना वाहण्यासाठी माका वापरतात, एव्हढाच काय तो आपला आणि माक्याचा संबंध.  माक्यालाच भृंगराज असे संस्कृत नाव आहे. माका हा रसायन आणि बुद्धिवर्धक आहे. केसांच्या आजारांवर, वाढीवर अत्यंत उपयुक्त आहे. डोळ्यांना आणि त्वचेला हितकर आहे. माक्याचा रस सिद्ध करून तयार केलेले भृंगराज तेल केसांच्या वाढीसाठी, केसात कोंडा होणे, टक्कल पडणे, केस पांढरे होणे यावर वापरतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी माक्याचे तेल नियमित डोक्याला लावावे. डोके दुखत असल्यास माक्याचा रस नाकात टाकावा किंवा डोळ्यांना चोळावा.
                  काविळीवर माक्याच्या रसाचा किंवा चूर्णाचा खूप उपयोग होतो. सूज आली असल्यास माक्याच्या रसात मिरेपूड घालून द्यावी व सूजेलाही लावावी. भाजलेल्या जखमेवर, किंवा कोणत्याही जखमेवर जखम भरून आल्यानंतर माक्याचा रस तेथे नियमित लावावा म्हणजे त्वचेवर डाग पडत नाहीत.
                  ज्या भागात चरबी वाढली असेल तेथे माक्याचा रस चोळून लावावा. तोंड आले असल्यास माक्याची पाने चावून थुंकावीत. त्वचेच्या विविध रोगांवर, खाज येणे, पुळ्या, पित्त येणे यावर माक्याचा रस लावावा.


 

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड