वाळा
उन्हाळ्यात माठाच्या पाण्यात वाळा घातला असता ते पाणी थंड व सुगंधी होते. त्या पाण्याने तहान भागते. वाळ्याचे पडदे खिडक्या, दारे, गाड्या यांना लावतात. पिवळा वाळा, काळा वाळा असे वाळ्याचे दोन प्रकार आहेत.
वाळा हा अतिशय थंड आहे. अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. लघवीला आग, जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो.
मुलांचा घोळाणा फुटणे, विशेषत: उन्हाळ्यात काही मुलांना हा त्रास खूप होतो. यावर वाळ्यापासून तयार केलेले 'उशीरासव' इतर औषधांबरोबर वापरतात. घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात. त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात. त्यामुळे त्वचा टवटवीत होते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्त्राव यावर वैद्यांच्या सल्ल्याने वाळ्याचा उपयोग करतात.
अशाप्रकारे गरीबांचा A.C. असणारया या बहुगुणी वाळ्याचा विशेषत: उन्हाळ्यात खूप उपयोग होतो.

Comments