सोमवार, २० जानेवारी, २०१४

निर्गुंडी           निर्गुंडीचा पाला हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, रानात जागोजागी आढळते. वाताच्या विविध विकारांवर निर्गुंडीचा खूपच चांगला उपयोग होतो.

संधिवात, सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे, गुडघ्याच्या हालचालीला त्रास होणे यावर निर्गुंडीचा पाला गरम करून सांध्यांना बांधावा. अंगदुखी, लचक भरणे, शरीराचा विशिष्ट भाग दुखणे, यावरही पाला बांधावा. विशिष्ट भागाला त्वचेखाली सूज आली असता निर्गुंडीचा पाला गरम करून बांधावा. 
         निर्गुंडी ही उत्तम वेदनाशामक आहे. इतर वेदनाशामक औषधांचे, गोळ्यांचे जसे दुष्परिणाम असतात तसे या वनस्पतीचे नाहीत. शरीराच्या कोणत्याही ठिकाणच्या वेदनाशमनासाठी निर्गुंडी उपयुक्त आहे.

         डोकेदुखी, डोके जड होणे यावर निर्गुन्डीचा पाला कपाळाला बांधावा. निर्गुंडीपासून तेल तयार करतात. या निर्गुंडी तेलाचासुद्धा उपयोग वरील संधिवात, सांधेदुखी यासारख्या सर्व आजारांवर होतो. सुजेवर, सांधेदुखीवर निर्गुंडीची पाने पाण्यात टाकून त्याने दुखऱया‌‍‍‌ जागेवर वाफारा द्यावा, नंतर तेल लावावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: