Posts

धनुर्मास

  धनुर्मास © लेखक- डॉ. गोपाल मेघश्याम सावकार, चेतनानगर, इंदिरानगर Annex, नाशिक फोन नं.- 8149988904, इमेल- gsawkar@gmail.com   उत्तरायणातील शिशिर ऋतूत धनुर्मास येतो. सूर्याच्या धनुराशीतील वास्तव्याच्या महिन्याला धनुर्मास म्हणतात. धनुर्मासालाच धुंधुरमास , झुंझुरमास अथवा शून्यमास किंवा धन्धुर्मास असेही म्हणतात. हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्म मुहूर्त म्हणजेच देवतांची पहाट असते , असे म्हटले जाते. पंचांगातसुद्धा धनुर्मास सुरु कधी होतो आणि संपतो कधी हे दिलेले असते. त्या काळात पहाटेच्या वेळी नैविद्य दाखवून पहाटे किंवा सकाळी लवकर जेवण घेण्याची प्रथा आहे. मुगाची खिचडी , कढी , बाजरीची भाकरी , लोणी , वांग्याचे भरीत , तूप असा चविष्ट बेत या दिवसात करतात. सकाळी सकाळी भरपेट जेवण व्हावे असा हेतू त्यामागे आहे.   दक्षिण भारतात धनुर्मासाचे खूप महत्त्व आहे. त्या काळात विष्णूची पूजा केली जाते. मकरसंक्रांतीच्या आधी भोगी येते. त्यादिवशीही असाच बेत करतात. भोगीची भाजीही प्रसिद्ध आहे. हरबरा, वांगे, कांदे, वाल, मेथी, वाटाणे, गाजर, खोबरे, तीळ अशी मिक्स व्हेज टाईप भाजी असते. पोपटी किंवा उंधियो याच प्

अभ्यंग स्नान

  अभ्यंगम् आचरेत् नित्यं स जरा श्रम वात: II आपल्या शरीरातील अवयवांचे त्वचा रक्षण करीत असते. त्वचा हे शरीराचे बाह्य आवरण आहे. तसेच शरीराचा मुख्य प्रदर्शनीय भाग आहे. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य निगा राखल्यास व्यक्तीमत्त्वाची उत्तम छाप पडते. त्वचेचे पुष्कळ विकार हे हृदयरोग, बेशुद्धी यासारखे गंभीर नसतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा विकारांकडे  दुर्लक्ष्य केले जाते. परंतु एकूणच आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य  उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे  महत्त्वाचे आहे. निरोगी  त्वचेचे रक्षण  व्हावे , त्वचेचे निगा योग्य प्रकारे  राखली  जावी यासाठी आयुर्वेदात  अभ्यंग  स्नानाचे   महत्त्व सांगितलेले आहे.               हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे  त्वचा रूक्ष  व फुटीर होते. त्यामुळे ह्या ऋतूत त्वचा विकार होण्याचा जास्त संभव असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान, पथ्यापथ्य पाळणे, आयुर्वेदिक औषधे घेणे  यासारख्या उपायांनी त्वचेची काळजी  घेणे हितावह ठरते. आपण फक्त दिवाळी सारख्या मंगल प्रसंगीच अभ्यंग स्नान करीत  

अगस्ती दर्शन

  मंडळी, पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये असलेले काही उल्लेख आपल्याला कळत नाही. उगीच काही तरी दिले असेल म्हणून आपण दुर्लक्ष करतो. जाणकार व्यक्तीने समजावून सांगितले तर ठीक, नाहीतर आपण लक्ष देत नाही. आता हेच पहा ना ! ९ ऑगस्ट रोजी अगस्ती दर्शन असा उल्लेख पंचांगात आणि कॅलेंडरमध्ये आहे. म्हणजे काय, तर आकाशात अगस्ती ता-याचा उदय या दिवशी झाला. अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो. अर्थात ही कालगणना प्राचीन कालापासून चालत आली आहे. सध्या ऋतूमान बदलल्यामुळे अगस्ती उदय झाला म्हणजे शरद ऋतु सुरु झाला असे मात्र नाही. असो. पण याचा आरोग्याशी, आयुर्वेदाशी काय संबंध ? अगस्ती ता-याच्या उदयाने पाणी शुद्ध होते असा आयुर्वेदात उल्लेख आहे. अगस्ती ता-याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते. असे पाणी सर्वांनी पिण्यास योग्य आहे. इतकेच नव्हे तर अगस्तीच्या उदयाने सर्व व