Posts

अभ्यंग स्नान - त्वचा सौन्दर्यासाठी

             आपल्या शरीरातील अवयवांचे त्वचा रक्षण करीत असते. त्वचा हे शरीराचे बाह्य आवरण आहे. तसेच शरीराचा मुख्य प्रदर्शनीय भाग आहे. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य निगा राखल्यास व्यक्तीमत्त्वाची उत्तम छाप पडते. त्वचेचे पुष्कळ विकार हे हृदयरोग, बेशुद्धी यासारखे गंभीर नसतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा विकारांकडे दुर्लक्ष्य केले जाते. परंतु एकूणच आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य  उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी  त्वचेचे रक्षण व्हावे , त्वचेचे निगा योग्य प्रकारे  राखली  जावी यासाठी आयुर्वेदात  अभ्यंग  स्नानाचे   महत्त्व सांगितलेले आहे.              हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे  त्वचा रूक्ष  व फुटीर होते. त्यामुळे ह्या ऋतूत त्वचा विकार होण्याचा जास्त संभव असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान, पथ्यापथ्य पाळणे, आयुर्वेदिक औषधे घेणे  यासारख्या उपायांनी त्वचेची काळजी  घेणे हितावह ठरते. आपण फक्त दिवाळी सारख्या मंगल प्रसंगीच अभ्यंग स्नान करीत  असतो. परंतु केवळ दिवाळीतच नाह

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! HAPPY DIPAWALI TO ALL READERS OF MY BLOG !!!    

दुर्वा

     मंडळी, गणरायांचे आगमन घरोघरी झाले असेल. गणपतीला सर्वात प्रिय वनस्पती म्हणजे दुर्वा. गणपतीचे दिवस आले की आपण दुर्वांच्या शोधात बाहेर पडतो. दुर्वा ह्या स्त्रियांच्या गर्भाशयाचे उत्तम टोनिक समजल्या जातात. गर्भाशयाला बलकारक, गर्भपोषणासाठी उपयुक्त तसेच गर्भाशयाची आणि गर्भाची वाढ चांगली व्हावी म्हणून दुर्वांचा खूप उपयोग होतो. मासिक पाळीच्या समस्यांवर दुर्वांचा रस पोटात घ्यावा.          नाकातून घोळाणा फुटत असल्यास दुर्वांचा रस नाकात पिळावा. दुर्वा ह्या थंड आणि तहान भागविणाऱ्या आहेत. जखमेतून रक्तस्त्राव होत असून तो लवकर थांबण्यासाठी दुर्वांचा रस लावावा.        लघवीला आग होणे, लघवी कमी होणे, कळ लागून लघवी होणे, लघवी साफ न होणे या सर्व लघवीच्या विकारांवर दुर्वांचा रस घ्यावा.       डोळे येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, यावर दुर्वांच्या रसाचे थेंब डोळ्यात टाकावेत, पोटातही घ्यावेत.       उलट्या होत असल्यास तांदूळ धुतलेल्या पाण्यात दुर्वांचा रस घालून प्यावा. सारखी उचकी लागत असल्यास दुर्वांच्या मुळांचा रस आणि मध एकत्र करून प्यावे.       अंगाची आग होणे, उष्णतेजवळ काम केल्याने त्वचा ला