Posts

कवठ (कपित्थ)

    कवठ हे वसंत ऋतूत येणारे फळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाची गूळ घालून चटणी करतात. भगवान शंकराचा प्रसाद म्हणून कवठाचे सेवन करतात. महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी श्रद्धा आहे.      दक्षिण महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाच्या वाडीला कवठाची बर्फी मिळते. अतिशय रुचकर असा हा खाद्य पदार्थ आहे. कवठाची बर्फी, चटणी अतिशय रुचकर, पित्तशामक, जिभेची चव वाढवणारी आहे. कवठ हे अम्लपित्तावर खावे. काविळीवर कवठाच्या पाल्याचा रस घ्यावा.      कवठाने आवाज चांगला होतो. कवठ खोकल्यावर गुणकारी आहे.      मात्र कच्चे कवठ खाऊ नये. चांगले पिकलेले कवठ खावे. असे हे बहुगुणी कवठ आहे.

संपर्कासाठी

मंडळी, २००० च्या वर पेज views आणि ब्लॉगला मिळणारा प्रतिसाद आणि त्यामुळे आयुर्वेदाला मिळणारा प्रतिसाद पाहून मला अतिशय आनंद झाला. अनेकांना माझ्याशी संपर्क कसा करावा हे माहीत नव्हते. त्यासाठी मी माझा इ मेल ब्लॉगवर देत आहे.  

मेथी

      मेथीची पालेभाजी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे उत्पादन खूप होते. तसेच मेथीचे बी बाजारात मिळते. या मेथीच्या बीपासून मेथीचे लाडू तयार करतात. हे लाडू हिवाळ्यात, हेमंत, शिशिर ऋतूत खातात. मेथीचे लाडू अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक असतात. मेथीची भाजीसुद्धा अतिशय  पौष्टिक असते. तुरीच्या डाळीबरोबर मेथीचे दाणे एकत्र करून त्याचे कालवण करतात. त्याला 'पेंडपालं' असे म्हणतात.       बाळन्तिणीला डिंकाचे, मेथीचे लाडू खायला देतात. प्रसूतीकाळात झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी हा आहार देतात. मेथीमुळे बाळन्तिणीच्या अंगावरचे दूधसुद्धा वाढते. तसेच गर्भाशय शोधन होते. प्रसूतीकाळात गर्भाशयात साचलेल्या, साठलेल्या दोषांचा निचरा करण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.       मेथीच्या बिया शरीरातील अतिरिक्त मेद कमी करतात. बियांचे चूर्ण नियमित घेतल्यास मेद कमी होतो. प्रमेहावर मेथीच्या बियांचा चांगला उपयोग होतो. रक्तातील साखर वाढणे, वारंवार लघवीला जावे लागणे, बैठ्या जीवनशैलीमुळे होणारा मधुमेह (टाईप २) यावर दाणामेथीचा चांगला उपयोग होतो.      विविध वाताचे विकार, कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखी यावर म