Posts

हळद

चंपाषष्ठी अर्थात खंडोबाच्या उत्सवाच्या निमित्ताने हळदीचा भंडारा उधळला जातो. मणिमल्ल दैत्यांशी कडेपठारावर लढाई खेळलेल्या खंडोबाने हळदीला आपल्या आवडत्या द्रव्यात स्थान दिले ह्यात काय नवल ?  झालेल्या जखमांमधील रक्तस्राव थांबवून जखमा भरून आणणे यात हळद अत्यंत श्रेष्ठ आहे. हळदीमुळे जखमा तर व्यवस्थित भरतातच शिवाय जखमेचे व्रणही शिल्लक रहात नाहीत. 'पी हळद आणि हो गोरी' अशी म्हण तिरकस अर्थाने असली तरी त्वचेचा रंग उजळण्यात हळद सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच लग्नात आधी हळद लावण्याची प्रथा आहे. हळद अंगाला लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. त्वचा  सतेज आणि कांतिमान होते. हळदीच्या अंगी रक्तशुद्धीकरणाचा मोठा गुणधर्म आहे. हळद रक्तवर्धक  आहे. खाज, खरूज, त्वचेवर पित्त उठणे यासारख्या त्वचारोगांवर पोटातून हळद घ्यावी आणि बाहेरूनही हळद लावावी.  मधुमेहातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हळद आणि  आवळकाठी चूर्ण एकत्र करून घ्यावे. आवळ्याच्या माहितीत हे  आपण पाहिलेच.    सर्दी, खोकला यावर हळदीचा चांगला उपयोग होतो. हळद कफघ्न आहे. काही जणांना दुध घेतल्यामुळे कफ होतो, त्

आवळा

"आवळा देऊन कोहळा काढणे" अशी म्हण प्रचारात असली तरी आवळा देणे म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती गमावणे   होय. तुळशीच्या लग्नाचे दिवस सुरु झाले की चिंचा,  बोरे, आवळे अशा  मुलांच्या आवडत्या रानमेव्याचेही दिवस सुरु होतात. आपण आई बाबा मात्र 'नको खाऊ, सर्दी खोकला होईल' म्हणून त्यांना दाटत असतो. आवळे अष्टमी ही याच दिवसात येते. आवळा हे हविष्याचे द्रव्य म्हणून ओळखले जाते. च्यवनप्राश खाऊन तरूण झालेल्या च्यवन ऋषींची हकीकत सर्वांना माहितीच आहे. आवळा हा रसायन कार्य करणारा आहे. रूढ अर्थाने शरीर तरूण बनविणे असा अर्थ निघत असला तरी शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म पेशींची झीज कमी करणे, degenerative changes कमी करणे असाही रसायन शब्दाचा अर्थ होतो. अर्थात च्यवन प्राशाच्या खपाने अनेक औषधी कंपन्या गब्बर झाल्या असल्या तरी खात्रीशीर च्यवनप्राश घ्यावा. च्यवनप्राश अनेक स्वरूपात उपलब्ध आहे. granules , chewable tabs , chocklets अश्या स्वरूपात असले तरी पारंपारिक पद्धतीने तयार केलेला जास्त परिणामकारक ठरतो. आवळा हा 'परं वृष्य' सांगितलेला आहे. च्यवनांसारख्या म्हाताऱ्या ऋषींना याच्या सेवनाने कामशक्ती

The Role Of Ayurveda and Yoga In Cure Of Psychosomatic Disorders

Author- Dr. Gopal Meghashyam Sawkar, Lecturer, School Of Health Sciences, Yashawantrao Chavan Maharashtra Open University, Nashik Phone- 0253- Off.- 2230718, Res.- 2372315, Mobile- 9422758069 Email- gsawkar@gmail.com , g_sawkar@yahoo.com The Role Of Ayurveda and Yoga In The Cure Of Psychosomatic Disorders Yoga And Ayurveda Based On The Indian Philosophy- Indian philosophy is based on spiritualism, which is known as Adhyatma in Sanskrit language. Adhyatma means the study of soul which is the base of our life, which is beyond any birth and death, which is unchangeable, eternal, everlasting, and immortal. This Adhyatma or the study of soul and self realization is deeply rooted in the Vedas, the Upanishadas, the Bhagavad-Gita, the six philosophical schools known as Shaddarshan that is Sankhya, Yoga, Nyaya, Vaisheshika, Purvamimansa, Uttarmimansa which is known as Vedanta. Eighteen Puranas (Mythologies), the Ramayana, the Mahabharata explain the Indian philosophy, cultural and m