Posts

पावसाळा, तब्येत सांभाळा !!

  वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. तृषार्त धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे. आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रकोपावर ’बस्ती’ हा पंचकर्मांपैकी एक महत्वाचा उपक्रम आयुर्वेदात सांगितलेला आहे. विविध औषधांनी युक्त काढ्यांचा किंवा तेलाचा एनिमा विधिपूर्वक घेणे असे सोप्या भाषेत सांगता येईल. या बस्तीने अनेक संभाव्य...

शिशिर ॠतूतील काळजी

  महाराष्ट्रात सध्या शहरांचा विकास सध्या जोरात सुरु आहे. उंच इमारतिंबरोबरच रस्ते, उड्डाणपूल, यांची कामे जोरात सुरु आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे, वेगवेगळ्या कारणांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. वातावरणात उडणारी धूळ, थंडी, धुक्यामुळे धूलीकण जमिनीलगतच्या वातावरणात जास्त वेळ राहतात. तसेच सध्या शिशिर ऋतू सुरु असल्याने वृक्षांची पानगळ सुरु आहे. ही गळालेली पाने, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जाळला जातो. त्याचाही धूर वातावरणात मिसळतो. हे धुलीकण, धूळ, धूर श्वासोच्छ्वासावाटे फुफ्फुसात, नाकात, जाऊन त्यामुळे विविध आजार होऊ शकतात. रस्त्यावरील खड्डे, खाचखळगे यामुळे मानदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार होऊ शकतात. असलेले आजार वाढतात. धूळ, धूर यामुळे असात्म्यताजन्य विकार बळावतात. सर्दी, शिंका, घसा दुखणे हे आजार होतात. दमा असल्यास दम्याचा वेग तीव्र होतो. लहान मुलांनाही याचा त्रास होतो. डोळ्यात कचरे जाणे, धूळ जाणे, डोळे लाल होणे, पाणी येणे असे डोळ्यांचेही आजार होतात. यावर पुढील काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतील. सर्दी, शिंका, खोकला-   धूर, धुळीम...

अभ्यंग स्नान - त्वचा सौन्दर्यासाठी

Image
आपल्या शरीरातील अवयवांचे त्वचा रक्षण करीत असते. त्वचा हे शरीराचे बाह्य आवरण आहे. तसेच शरीराचा मुख्य प्रदर्शनीय भाग आहे. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य निगा राखल्यास व्यक्तीमत्त्वाची उत्तम छाप पडते. त्वचेचे पुष्कळ विकार हे हृदयरोग, बेशुद्धी यासारखे गंभीर नसतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा विकारांकडे  दुर्लक्ष्य केले जाते. परंतु एकूणच आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य  उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे  महत्त्वाचे आहे. निरोगी  त्वचेचे रक्षण  व्हावे , त्वचेचे निगा योग्य प्रकारे  राखली  जावी यासाठी आयुर्वेदात  अभ्यंग  स्नानाचे   महत्त्व सांगितलेले आहे.               हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे  त्वचा रूक्ष  व फुटीर होते. त्यामुळे ह्या ऋतूत त्वचा विकार होण्याचा जास्त संभव असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान, पथ्यापथ्य पाळणे, आयुर्वेदिक औषधे घेणे  यासारख्या उपायांनी त्वचेची काळजी ...