Posts

दुर्वा

     मंडळी, गणरायांचे आगमन घरोघरी झाले असेल. गणपतीला सर्वात प्रिय वनस्पती म्हणजे दुर्वा. गणपतीचे दिवस आले की आपण दुर्वांच्या शोधात बाहेर पडतो. दुर्वा ह्या स्त्रियांच्या गर्भाशयाचे उत्तम टोनिक समजल्या जातात. गर्भाशयाला बलकारक, गर्भपोषणासाठी उपयुक्त तसेच गर्भाशयाची आणि गर्भाची वाढ चांगली व्हावी म्हणून दुर्वांचा खूप उपयोग होतो. मासिक पाळीच्या समस्यांवर दुर्वांचा रस पोटात घ्यावा.          नाकातून घोळाणा फुटत असल्यास दुर्वांचा रस नाकात पिळावा. दुर्वा ह्या थंड आणि तहान भागविणाऱ्या आहेत. जखमेतून रक्तस्त्राव होत असून तो लवकर थांबण्यासाठी दुर्वांचा रस लावावा.        लघवीला आग होणे, लघवी कमी होणे, कळ लागून लघवी होणे, लघवी साफ न होणे या सर्व लघवीच्या विकारांवर दुर्वांचा रस घ्यावा.       डोळे येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, यावर दुर्वांच्या रसाचे थेंब डोळ्यात टाकावेत, पोटातही घ्यावेत.       उलट्या होत असल्यास तांदूळ धुतलेल्या पाण्यात दुर्वांचा रस घालून प्यावा. सारखी उच...

बेल

Image
     श्रावण महिना आला की आपल्याला बेलाची आठवण होते.   महादेवाला बेल अतिशय प्रिय आहे. श्रावणात रोज किंवा निदान श्रावणी सोमवारी तरी महादेवाला बेल वाहातात.    बेलाच्या बेलफळांचा  बेल मुरब्बा करतात. बेलमुरब्ब्याचा उपयोग  अतिसार , जुलाब यावर खूप चांगला होतो.  आव पडणे, शेम चिकट पडणे, संडास वाटे रक्त पडणे, यावर  बेलफलातील  गर किंवा बेलमुराब्बा द्यावा.    लहान मुलांना सारखी आव होत असेल तर त्यावरही  बेल मुरब्बा देतात.  मुलांना जंत झाले असल्यास बेलाच्या पानांचा रस द्यावा. अम्लपित्तावरही बेलाच्या पानांचा रस देतात.      शरीराला घामामुळे दुर्गंधी येत असेल तर बेलाच्या पानांचा रस लावावा. घामाची दुर्गंधी येण्...

आघाडा

Image
       श्रावण महिना सुरु झाला की आघाड्याच्या शोधात आपण बाहेर पडतो. श्रावणात विविध देव देवतांना बेल, आघाडा, दुर्वा वाहातात. इतर वेळी मात्र आपल्याला ह्या वनस्पतींची आठवण होत नाही. पावसाळ्यात आघाडा जागोजागी उगवतो. पांढरा आघाडा आणि तांबडा आघाडा असे आघाड्याचे मुख्य दोन प्रकार आहेत.        आघाड्यापासून क्षार तयार करतात. त्याला 'अपामार्ग क्षार' असे म्हणतात. याचा उपयोग मूतखड्यावर होतो. अपामार्ग क्षारापासून तेल तयार करतात.  त्याचा उपयोग बहिरेपणा,  ऐकू न येणे,  कानात  विविध आवाज येणे यावर होतो. अपामार्ग क्षार हा वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. कारण तो तीक्ष्ण आहे.        पूर्वी दात घासण्यासाठी आघाड्याच्या काडीचाही उपयोग करीत. त्वचारोगावर आघाड्याच्या काढ्याचा उपयोग करतात. खोकल्यावर याचे चूर्ण मधातून चाटवावे. आघाडा हा वामक आहे. याच्या सेवनाने उलट्या होऊ शकतात....