Posts

Showing posts from 2014

नाचणी

         नाचणीलाच ‘नागली’ असेही म्हणतात. नागलीचे पापड प्रसिद्धच आहेत. नाचणीची भाकरी, आंबील करतात. नाचणीचे सत्त्वही लोकप्रिय आहे.         नाचणी ही हलकी, पौष्टिक, बलदायक, थंड, भूक भागविणारी आहे.         नाचणीचे सत्त्व विशिष्ट पद्धतीने काढतात. नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी पाण्यातून काढावी. नंतर बारीक वाटावी. म्हणजे त्यातून दुधासारखे पाणी निघेल. ते पाणी गाळून कढईच्या भांड्यात स्थिर ठेवावे. हळूहळू नाचणीचे सत्त्व भांड्यात तळाशी जमा होईल. नंतर वरचे पाणी काढून टाकावे. तळाशी साचलेले सत्त्व वाळवून वापरावे. हे सत्त्व पचायला हलके, पौष्टिक, शक्तीवर्धक आहे. विशेषत: मधुमेही रुग्णांमध्ये नाचणीच्या सत्त्वाचे पदार्थ द्यावेत.        नाचणीच्या भाकरी, नाचणीचे पदार्थ खाल्ले असताही मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित रहाते.   नाचणीचे पापड याच गुणांचे आहेत, म्हणून पचायला हलके आहेत.        वजन कमी क...

दिवाळीच्या शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या आरोग्यपूर्ण हार्दिक शुभेच्छा !!!  

नारळ

             आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळास फार महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळाने होते. प्रेमाने (?) रवानगी करायची असेल तरी नारळ   दिला जातो. नारळाची भेट, नारळाचा प्रसाद हे प्रेमाचे द्योतक आहे. नारळाशिवाय पूजेची सुरुवात होत नाही. सुवासिनीची कोठेही जाताना आनंद प्रसंगी किंवा मंगल प्रसंगी नारळाने ओटी भरणे शुभ मानले जाते. नारळाचे संपूर्ण झाड उपयुक्त आहे. नारळाला कल्पवृक्ष मानले आहे. नारळाचे खोबरे, तेल, नारळाचे दूध, नारळातील पाणी याचे खूप उपयोग आहेत. नारळाच्या करवंटीचाही उपयोग होतो. पानांपासून खराटा, झाडू करतात.         नारळ पचायला थोडे जड आहे, तसेच स्निग्ध, थंड, बलदायक, कफवर्धक, गोड, तहान व पित्तनाशक आहे. कोणत्याही कारणाने अवयव मुरगळला असेल, स्नायू दुखावला असेल तर नारळाचा किस, हळद यांचे मिश्रण गरम करून शेकल्यास ठणका, सूज याला आराम पडतो. नारू, गजकर्ण यावरही याचा उपयोग होतो. नारळाचे तेल केसवर्धक, त्वचा मऊ करणारे आहे. त्वचेच्या सुरकुत्या, डाग, यावर ओल्या खोब-याचे ...

नूतन वर्षाभिनंदन

मंडळी , नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! नूतन  वर्षी  आपणास कडूनिंबाच्या झाडाप्रमाणे दीर्घायुरोग्य लाभो. लवकरच नवीन विषय घेऊन येत आहे. हा ब्लॉग वाचत रहा.

शिकेकाई

         शिकेकाई सुप्रसिद्धच आहे. शिकेकाई कुटून पाण्यात कालवून त्याच्या सहाय्याने केस स्वच्छ करतात. शिकेकाईमुळे केस स्वच्छ धुतले जातात. केसात कोंडा असेल तर शिकेकाई उपयुक्त आहे. केसांच्या विविध तक्रारी, केसांची वाढ नीट न होणे, केस गळणे, पिकणे, यावर शिकेकाई लावावी. रासायनिक शाम्पू लावण्यापेक्षा शिकेकाई वापरल्या केसांचे आरोग्य निश्चित चांगले राहाते. शिकेकाईचे पाणी अंगाला लावल्यासही अंगही स्वच्छ निघते. शिकेकाईचे पाणी पोटात जास्त प्रमाणात गेल्यास उलट्या होऊ शकतात. पोटात विष गेल्यास प्राथमिक उपचार म्हणून काही वेळा शिकेकाईचे पाणी पाजून उलट्या करवतात.   

धोतरा

Image
          धोतरा ही अतिशय विषारी वनस्पती आहे. पण योग्य मात्रेत, योग्य वेळी, आणि तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने औषधात वापरला असता गुणकारी ठरतो.           याचा उपयोग प्रामुख्याने ‘दमा’ या व्याधीत होतो. दम्यात श्वासवाहिन्यांचा व्यास कमी झालेला असतो. त्यामुळे प्राणवायूचा पुरेसा पुरवठा शरीराला होत नाही. अशा वेळी धोत-याचा वापर केला असता श्वासवाहिन्या मोकळ्या होतात. तसेच साठलेल्या कफाचा नाश होऊन दमा दूर होतो. धोत-याच्या पानांची नुसती धुरी घेतली तरी दम्याची लक्षणे लगेच कमी होतात.          यापासून कनकासव करतात. तसेच त्रिभुवनकीर्ती या प्रसिध्द औषधात धोत-याचा वापर करतात. म्हणून ही औषधे घेताना वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. विशेषत: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी धोत-याचा जपून वापर करावा.           धोत-याच्या काळा आणि पांढरा   अशा दोन जाती आहेत. काळा धोतरा जास्त गुणकारी आहे. खोकला, कफ यावर धोत-याचा खूप उपयोग ह...

बदाम

          सुकामेवा म्हणून   बदाम प्रसिध्द आहेत. बदाम हे अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक आहेत. बदामाचे तेल सुद्धा निघते. हे तेल सौंदर्य प्रसाधनामध्ये सौन्दर्यवृद्धीसाठी, त्वचा कांतिमान होण्यासाठी वापरतात. हिवाळ्यात पौष्टिक खाद्य म्हणून बदामाचा शिरा खातात. डोकेदुखी, डोके जड होणे, अर्धशिशीवर बदामाचा खूप उपयोग होतो.            आयुर्वेदानुसार बदामामुळे मज्जाधातूची वृध्दी होते. बदाम हे बुध्दीच्या वाढीसाठी खातात. बुध्दीची धारणाशक्ती वाढावी, वाचलेले लवकर लक्षात यावे, वाचलेले दीर्घकाळ लक्षात रहावे यासाठी बदाम खावेत.            बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. तसेच प्रथिने, स्निग्ध पदार्थही असतात. बदामा पासून भरपूर कॅलरीज मिळतात. बदाम उष्ण गुणाचे असल्यामुळे एकाच वेळी खूप बदामाचे सेवन करू नये.

निर्गुंडी

Image
           निर्गुंडी चा पाला हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, रानात जागोजागी आढळते. वाताच्या विविध विकारांवर निर्गुंडी चा खूपच चांगला उपयोग होतो. संधिवात, सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे, गुडघ्याच्या हालचालीला त्रास होणे यावर निर्गुंडी चा पाला गरम करून सांध्यांना बांधावा. अंगदुखी, लचक भरणे, शरीराचा विशिष्ट भाग दुखणे, यावरही पाला बांधावा. विशिष्ट भागाला त्वचेखाली सूज आली असता निर्गुंडी चा पाला गरम करून बांधावा.           निर्गुंडी ही उत्तम वेदनाशामक आहे. इतर वेदनाशामक औषधांचे, गोळ्यांचे जसे दुष्परिणाम असतात तसे या वनस्पतीचे नाहीत. शरीराच्या कोणत्याही ठिकाणच्या वेदनाशमनासाठी निर्गुंडी उपयुक्त आहे.          डोकेदुखी, डोके जड होणे यावर निर्गुन्डीचा पाला कपाळाला बांधावा. निर्गुंडीपासून तेल तयार करतात. या निर्गुंडी तेलाचासुद्धा उपयोग वरील संधिवात, सांधेदुखी यासारख्या सर्व आजारांवर होतो. सुजेवर, सांधेदुखीवर निर्गुंड...