Posts

Showing posts from 2013

एक लाखाचे सीमोल्लंघन

मंडळी,             दस-याच्या शुभमुहूर्तावर 'सर्वांसाठी आयुर्वेद' या आपल्या लोकप्रिय ब्लॉगने एक लाखाच्या वाचकसंख्येचे सीमोल्लंघन करून नवा विक्रम केला.            आपणा सर्व वाचकांच्या प्रतिसादानेच आणि शुभेच्छानीच  मजसारख्या व्यक्तीला हुरूप आला. मला अवगत छोट्या ज्ञानाला आपण ही मोठी पावती दिलीत. माझ्या अनियमित लिखाणावर आपण अतिशय प्रेम केलेत. केवळ मोजक्या पोस्ट असताना भरघोस प्रतिसाद दिलात. नवीन पोस्ट केव्हा येईल यासाठी मला उद्युक्त केलेत.          वाचकहो, मी आपला शतश: ऋणी आहे.          असेच प्रेम कायम ठेवा, पाठीवर हात ठेवा.  आपला, डॉ. गोपाल सावकार

लसूण

मंडळी, खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर आपल्याला भेटतोय. कार्यबाहुल्यामुळे उशीर झाला याबद्दल क्षमस्व. लसूणामध्ये लवण रस वगळता उरलेले पाचही रस आहेत. लसणाने जिभेला चव येऊन भूकही उत्तम लागते. म्हणून जेवणात लसणाचा वापर करतात. विशेषतः पावसाळ्यात लसणाचा भरपूर वापर करावा. पोटात वाट साठणे, पोट गडगडणे, पोट दुखणे यावर लसूण खाऊन वर कोमट पाणी प्यावे. सर्दी, खोकला, नाक वाहणे, शिंका येणे, खोकला यावर गरम कडकडीत फुटाणे व कच्चा लसूण चावून खावा. मात्र त्यावर पाणी पिऊ नये. कानात आवाज येणे, कान दुखणे यावर लसूण व तीळ तेलात कडकडून ते तेल कोमट झाल्यावर नित्य कानात घालावे. मात्र कान फुटला असताना तेल अजिबात घालू नये. रक्तातील कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण लसणाने कमी होते, हे सिद्ध झालेले आहे. हृदयरोग असणारे, रक्तवाहिनीत अडथळा असणारे, कोलेस्टेरॉल जास्त असणारे व्यक्ती यांनी कच्चा लसूण खावा. सांधे सुजणे, दुखणे यावर लसणाचा उपयोग होतो. लसूण बुद्धिवर्धक आहे. लसूण नित्य खाण्याने बुद्धी तरतरीत व तल्लख होते. लहान मुलांना लसूण दिल्याने पोटातील जंत मरतात. मुरडा येऊन आव पडत असल्यास लसूण खावा. अर्धे डोके दुखत असल्यास...

पळस

Image
           ‘पळसाला पाने तीनच’ अशी म्हण प्रसिद्ध आहे. पळसाची पाने आकाराने बरीच मोठी असतात. म्हणून पळसाच्या पानांच्या पत्रावळी तयार करतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर गरम गरम अन्न वाढले की त्या अन्नाबरोबर पळसाचेही औषधी गुणधर्म पोटात जावेत असा उद्देश आहे. मात्र ती पत्रावळ ताजी असावी. विशेषत: आजच्या आपल्या Disposable च्या युगात प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या हानिकारक वस्तूंमधून सेवन न करता पळसाच्या पानांच्या पत्रावळी, द्रोण वापरावेत. पळस (पलाश) हा ऊष्ण भूक वाढविणारा आहे. लहान मुलांना जंत झाले असता पळसपापडीचे चूर्ण आणि वावडिंग एकत्र करून घेतले असता सर्व प्रकारचे जंत पडून जातात. प्रमेहावर पळसाच्या पानांचा रस घ्यावा.           किडनीच्या विकारांवर पळस हा अतिशय उपयुक्त आहे. लघवीला जळजळ होणे, लघवीची उत्पत्ती नीट न होणे, किडनीचे विविध आजार, किडनीला सूज येणे, किडनीत लघवी साठणे, किडनीचा आकार वाढणे, अगदी Chronic Renal Failure पर्यंत सर्व आजारांवर पळसाचा उपयोग शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाला आहे. किड...

आले- सुंठ

         आल्यापासूनच सुंठ तयार करतात. दिसायला हे अतिशय किरकोळ औषध वाटत असले तरी त्याच्या अंगी गुणधर्म खूप आहेत. आले पाकात टाकून त्याच्या वड्या करतात. ह्या आलेपाकाच्या वड्या सेवन केल्या असता उत्तम भूक लागते. अपचन, करपट ढेकर, जिभेला चव नसणे यावर आलेपाकाच्या वड्या सेवन कराव्यात. नुसत्या सुंठेनेही खूप छान भूक लागते, जिभेला चव येते. पोटात वाट साठून पोट दुखत असल्यास सुंठ कोमट पाण्यातून घ्यावी. दमा, सर्दी, खोकला यावर सुंठ मधाबरोबर चाटवावी. ‘सुंठेवाचून खोकला गेला’ अशी म्हण म्हणूनच प्रचारात आहे. सुंठ हे ७२ रोगांवरचे औषध आहे असे म्हणतात ते खरेच आहे. आयुर्वेदातले कफदोषावरील हे अतिशय महत्त्वाचे औषध आहे.          डोके दुखत असल्यास कपाळाला सुंठेचा लेप लावावा. सर्वसाधारण तापाच्या सुरुवातीला अंग कसकस करीत असल्यास सुंठ घ्यावी. सांधेदुखी, सांधे सुजणे, यावर सुंठ व गूळ एकत्र करून खावा. त्याला गुड सुंठी योग म्हणतात. अजीर्ण होऊन जुलाब होत असल्यास सुंठ घ्यावी. अम्लपित्तावर सुंठ व साखर एकत्र करून खावी. सर्दी विशेषतः पावसाळ्यात...

हसा, पण लठ्ठ होऊ नका ! भाग- २

मंडळी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेक जाहिराती वाचल्या, बघितल्या असतील. त्यातील काही थोड्या तर बऱ्याच फसव्या सुद्धा असतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी   शास्त्रशुद्ध माहिती मिळतच नाही. नेचरकेअर वेलनेस क्लिनिकतर्फे हर्बल मेडीसिनबरोबच आहार, योगासने यांचा शास्त्रशुद्ध कोर्स तयार करण्यात आहे. यातील औषधे दर्जेदार आणि गुणकारी आहेतच, जोडीला आहार नियंत्रण व योगासनांचे मार्गदर्शन यामुळे आपले वजन निश्चितच योग्य नियंत्रणात राहील. शिवाय आपल्या व्यवसायाचे / कामाचे   स्वरूप, सवयी, उंची, बांधा यानुसार दिलेल्या कोर्सच्या नियमित पालनामुळे कमी झालेले वजन नेहमी नियंत्रणात राहील. पण आवश्यकतेपेक्षा कमी वजन ठेवा असे आम्ही कधीच सांगत नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, बांध्यानुसार योग्य वजनाचे प्रमाण निरनिराळे असू शकते. या कोर्समुळे अशक्त, रोगट शरीरापेक्षा निरोगी, सुदृढ समाज तयार होईल अशी आमची खात्री आहे. या कोर्समध्ये आपल्याला औषधांची किट दिली जाईल. औषधे मोजकीच असून घ्यावयास सोपी आहेत. सोबत आहारनियंत्रण, आसने, ३० मिनिटे चालणे यामुळे खूप फायदा होईल. डाएटींगचा अर्थ हल्ली ‘ खाणे कमी करा ’ असा घ...