शबरीची बोरे
शबरीने आपली उष्टी बोरे पावन करून ठेवलेली आहेतच. प्रभु श्रीरामांना मोठ्या भक्तीने उष्टी बोरे खाऊ घालणारया शबरीने बोरं मात्र अजरामर करून ठेवली आहेत. तसेच परीक्षित राजाला सर्पदंश हा बोरातील अळीच्या रूपाने आलेल्या तक्षक सर्पामुळे झाला, अशी कथा आहे. चिंचा, बोरे हा तर लहान मुलांचा आवडता मेवाच. तुळशीच्या लग्नापासून बाजारात बोरं यायला सुरुवात होते. आकाराने मोठी, मधुर अशी मेहरूणची बोरं प्रसिद्धच आहेत. सारखी खा-खा होणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे अशा भस्मक रोगावर बोराच्या बियांचे चूर्ण घ्यावे. अतिसार, संडासवाटे खूप पातळ जुलाब होणे, आव यावर बोराच्या मुळ्या आणि तीळ यांचे वेगवेगळे कल्क करून नंतर ते एकत्र करून गायीच्या दुधातून घ्यावे. संडासवाटे रक्त पडत असल्यास बोराच्या मुळ्यांचा चांगला उपयोग होतो. केसतोडा झाला असल्यास तेथे बोराचा पाला चोळावा किंवा पाल्याचा रस लावावा. उलट्या होत असल्यास बोराच्या बियांचे चूर्ण मधातून चाटवावे. शरीराच्या कोणत्याही भागाची आग होत असल्यास बोरीचा पाला चोळावा किंवा पाल्याचा रस लाव...