Posts

Showing posts from January, 2011

तिळाचे महत्त्व

         साधारणपणे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यामध्ये शिशिर ऋतु येतो. या ऋतूत सृष्टीत सर्वत्र रूक्षता असते. झाडांची पाने गळतात, त्याला पानगळ म्हणतात. वातावरणात बोचरी थंडी, गारठा असतो. अशा काळात मकरसंक्रांत येते. भारतीय संस्कृतीत असलेल्या सर्व रुढी, परंपरा ह्या भारतीय हवामानाचा विचार करूनच तयार केलेल्या आहेत. म्हणूनच मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळगू ळ   वाटण्याची प्रथा आहे. तीळगूळामध्ये तीळ आणि गूळ हे दोन प्रमुख घटक असतात.        तिळाचे आयुर्वेदात फार महत्त्व वर्णन केलेले आहे. तिलोद्भवम तैलम ।  तिळापासून निघते ते तेल होय. म्हणूनच तेलाला ’तेल’ हे नाव प्राप्त झाले. तेलात तीळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. शिशिर ऋतूत शरीरातील स्नेह कमी झालेला असतो, रुक्षता वाढलेली असते. अशा वेळी तिळाचे नियमित सेवन करावे. तीळ हे मधुर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टीक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत.       सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. हिवाळ्यात तिळतेलाने अंगाला अभ्यंग करावे. त्यामुळे त्वचा मऊ,...

धनुर्मास

      धनुर्मासालाच धुंधुरमास किंवा धन्धुर्मास असेही म्हणतात. हिवाळ्यामध्ये वातावरणातील शीतलतेमुळे देहोष्मा  शरीरांतर्गत जातो आणि त्यामुळे जाठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागते. अशा वेळी त्या जाठराग्नीला अनुरूप असा आहार घेतला नाही तर तो शरीरातील धातूंचे पचन करून दुर्बलता आणतो. त्यामुळे बल, पुष्टीदायक असा आहार घेणे आवश्यक आहे.          यासाठीच या काळात धनुर्मास पाळायची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची प्रथा आहे. त्यावेळी उठल्यानंतर आन्हिके उरकल्यावर नैविद्य दाखवून भरपेट भोजनच करावे अशी धनुर्मासाची प्रथा आहे. आहे की नाही खवैय्यान्साठी पर्वणी !        भोजनासाठी पदार्थ तरी कोणते ? गरम  गरम  खिचडी, त्यावर तूप,  तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, त्यावर लोणी, भरीत, वांग्याची भाजी, कढी, चटणी.         काय मंडळी सुटले की नाही तोंडाला पाणी ?...