Posts

कापूर

Image
          'कापूर' हा अतिशय पांढरा शुभ्र असतो. तो अतिशय थंड आहे. भगवान श्री शंकर कापराच्या रंगाचे आहेत म्हणून त्यांना ‘ कर्पूरगौर ’ म्हणतात. कोणत्याही देवतेची आरती झाल्यानंतर कर्पुरारती लावण्याची प्रथा आहे. कापूर जाळला असता हवेतील रोगकारक जंतू नाहीसे होतात. कापूर उडनशील आहे. तो उघडा ठेवला असता उडून जातो. म्हणून तो बंद डब्यात ठेवावा.          कापराच्या अनेक जाती आहेत.त्यात भीमसेनी कापूर श्रेष्ठ आहे. बाजारात जो सध्या कापूर मिळतो, तो अस्सल कापूर नव्हे. तो रासायनिक आहे. अस्सल भीमसेनी कापूर काष्ठौषधीच्या दुकानात मिळतो. कापूर थंड आहे. कापराचे तेल कोथ (कुजणे) नाशक आहे. वेदनाशमनासाठी कापराचे तेल वापरतात. तसेच इसबासारख्या त्वचा विकारांवर हे तेल वापरतात. कापूर डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असल्याने डोळ्यांच्या औषधात कापूर वापरतात. दाढदुखी, दात किडणे, सुजणे, दंतरोग यावर कापूर वापरतात. हल्ली लोकप्रिय झालेली विविध वेदनाशामक मलमे, औषधे, सर्दीवरील औषधे, यामध्ये कापूर असतो. कापराच्या झाडाच्या चिकाचा कापूर म्हणून वापर करतात.          द म , सर्दी, खोकला, घशाचे आजार, आवाज बसणे यावर कापराच

शतावरी

                      शतावरी वनस्पतीच्या मुळ्या जास्त औषधी असतात. या मूळ्याचे चूर्ण, स्वरस, काढा औषधात वापरतात. शतावरी ही उत्तम शक्तीवर्धक आहे. एकूणच शरीराचे बल शतावरीने वाढते. अशक्तपणा, उत्साह न वाढणे, यावर शतावरीचे चूर्ण रोज दुधाबरोबर घ्यावे. त्यामुळे बलवृद्धी होऊन रोगप्रतिकारशक्तीही उत्तम वाढते. शरीरयष्टी बारीक असणे, वजन न वाढणे, यावर शतावरी चूर्ण घ्यावे.         शतावरीच्या सहाय्याने तेल, तूप सिध्द करतात. शतावरीच्या तेलाने मालीश केली असता वजन वाढते. शतावरी घृताचे नियमित सेवन केले असता बल प्राप्त होते. आम्लपित्त, घशाशी जळजळ, त्यामुळे पोटात दुखणे यावर शतावरी चूर्ण घ्यावे. तसेच अल्सरचा त्रास असल्यास शतावरी चूर्ण तुपातून घ्यावे. त्यामुळे पेप्टेक अल्सर बरा होण्यास मदत होते.           शतावरी कल्प तर प्रसिद्धच आहे. ज्या काही औषधांमुळे आयुर्वेद प्रत्येक घरात आहे त्यापैकी एक म्हणजे शतावरी कल्प. याचा मुख्य उपयोग हा सध्या प्रसुतीनंतर अंगावर नियमित व भरपूर दूध येण्यासाठी होत असला तरी तो सर्वांनी दुधाबरोबर शक्तीवर्धक म्हणून घावा. लहान मुलांनाही शक्तीवर्धक पेय म्हणून द्यावे. गर्भार अवस्