Posts

निर्गुंडी

Image
           निर्गुंडी चा पाला हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, रानात जागोजागी आढळते. वाताच्या विविध विकारांवर निर्गुंडी चा खूपच चांगला उपयोग होतो. संधिवात, सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे, गुडघ्याच्या हालचालीला त्रास होणे यावर निर्गुंडी चा पाला गरम करून सांध्यांना बांधावा. अंगदुखी, लचक भरणे, शरीराचा विशिष्ट भाग दुखणे, यावरही पाला बांधावा. विशिष्ट भागाला त्वचेखाली सूज आली असता निर्गुंडी चा पाला गरम करून बांधावा.           निर्गुंडी ही उत्तम वेदनाशामक आहे. इतर वेदनाशामक औषधांचे, गोळ्यांचे जसे दुष्परिणाम असतात तसे या वनस्पतीचे नाहीत. शरीराच्या कोणत्याही ठिकाणच्या वेदनाशमनासाठी निर्गुंडी उपयुक्त आहे.          डोकेदुखी, डोके जड होणे यावर निर्गुन्डीचा पाला कपाळाला बांधावा. निर्गुंडीपासून तेल तयार करतात. या निर्गुंडी तेलाचासुद्धा उपयोग वरील संधिवात, सांधेदुखी यासारख्या सर्व आजारांवर होतो. सुजेवर, सांधेदुखीवर निर्गुंडीची पाने पाण्यात टाकून त्याने दुखऱया‌‍‍‌ जागेवर वाफारा द्यावा, नंतर तेल लावावे.

एक लाखाचे सीमोल्लंघन

मंडळी,             दस-याच्या शुभमुहूर्तावर 'सर्वांसाठी आयुर्वेद' या आपल्या लोकप्रिय ब्लॉगने एक लाखाच्या वाचकसंख्येचे सीमोल्लंघन करून नवा विक्रम केला.            आपणा सर्व वाचकांच्या प्रतिसादानेच आणि शुभेच्छानीच  मजसारख्या व्यक्तीला हुरूप आला. मला अवगत छोट्या ज्ञानाला आपण ही मोठी पावती दिलीत. माझ्या अनियमित लिखाणावर आपण अतिशय प्रेम केलेत. केवळ मोजक्या पोस्ट असताना भरघोस प्रतिसाद दिलात. नवीन पोस्ट केव्हा येईल यासाठी मला उद्युक्त केलेत.          वाचकहो, मी आपला शतश: ऋणी आहे.          असेच प्रेम कायम ठेवा, पाठीवर हात ठेवा.  आपला, डॉ. गोपाल सावकार

लसूण

मंडळी, खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर आपल्याला भेटतोय. कार्यबाहुल्यामुळे उशीर झाला याबद्दल क्षमस्व. लसूणामध्ये लवण रस वगळता उरलेले पाचही रस आहेत. लसणाने जिभेला चव येऊन भूकही उत्तम लागते. म्हणून जेवणात लसणाचा वापर करतात. विशेषतः पावसाळ्यात लसणाचा भरपूर वापर करावा. पोटात वाट साठणे, पोट गडगडणे, पोट दुखणे यावर लसूण खाऊन वर कोमट पाणी प्यावे. सर्दी, खोकला, नाक वाहणे, शिंका येणे, खोकला यावर गरम कडकडीत फुटाणे व कच्चा लसूण चावून खावा. मात्र त्यावर पाणी पिऊ नये. कानात आवाज येणे, कान दुखणे यावर लसूण व तीळ तेलात कडकडून ते तेल कोमट झाल्यावर नित्य कानात घालावे. मात्र कान फुटला असताना तेल अजिबात घालू नये. रक्तातील कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण लसणाने कमी होते, हे सिद्ध झालेले आहे. हृदयरोग असणारे, रक्तवाहिनीत अडथळा असणारे, कोलेस्टेरॉल जास्त असणारे व्यक्ती यांनी कच्चा लसूण खावा. सांधे सुजणे, दुखणे यावर लसणाचा उपयोग होतो. लसूण बुद्धिवर्धक आहे. लसूण नित्य खाण्याने बुद्धी तरतरीत व तल्लख होते. लहान मुलांना लसूण दिल्याने पोटातील जंत मरतात. मुरडा येऊन आव पडत असल्यास लसूण खावा. अर्धे डोके दुखत असल्यास