Posts

हसा, पण लठ्ठ होऊ नका ! भाग- २

मंडळी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेक जाहिराती वाचल्या, बघितल्या असतील. त्यातील काही थोड्या तर बऱ्याच फसव्या सुद्धा असतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी   शास्त्रशुद्ध माहिती मिळतच नाही. नेचरकेअर वेलनेस क्लिनिकतर्फे हर्बल मेडीसिनबरोबच आहार, योगासने यांचा शास्त्रशुद्ध कोर्स तयार करण्यात आहे. यातील औषधे दर्जेदार आणि गुणकारी आहेतच, जोडीला आहार नियंत्रण व योगासनांचे मार्गदर्शन यामुळे आपले वजन निश्चितच योग्य नियंत्रणात राहील. शिवाय आपल्या व्यवसायाचे / कामाचे   स्वरूप, सवयी, उंची, बांधा यानुसार दिलेल्या कोर्सच्या नियमित पालनामुळे कमी झालेले वजन नेहमी नियंत्रणात राहील. पण आवश्यकतेपेक्षा कमी वजन ठेवा असे आम्ही कधीच सांगत नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, बांध्यानुसार योग्य वजनाचे प्रमाण निरनिराळे असू शकते. या कोर्समुळे अशक्त, रोगट शरीरापेक्षा निरोगी, सुदृढ समाज तयार होईल अशी आमची खात्री आहे. या कोर्समध्ये आपल्याला औषधांची किट दिली जाईल. औषधे मोजकीच असून घ्यावयास सोपी आहेत. सोबत आहारनियंत्रण, आसने, ३० मिनिटे चालणे यामुळे खूप फायदा होईल. डाएटींगचा अर्थ हल्ली ‘ खाणे कमी करा ’ असा घेतला जातो

हसा, पण लठ्ठ होऊ नका भाग- १

               या ब्लॉगची लोकप्रिय पोस्ट लोकाग्रहास्तव पुन्हा प्रकाशित करीत आहे.   ' हसा , आणि लठ्ठ व्हा ' अशा स्वरूपाची म्हण प्रचारात आहे. हसण्याचा आणि लठ्ठपणाचा कितपत जवळचा संबंध आहे हे माहिती नाही. कारण प्रख्यात विनोदवीर चार्ली चापलीन आणि आचार्य अत्रे यांची व्यक्तिमत्त्वे भिन्न होती. पण लठ्ठपणा हा अनेक रोगांचे मूळ असल्यामुळे तुम्ही भले मनसोक्त हसा , पण लठ्ठ मात्र होऊ नका.            आयुर्वेदात आठ प्रकारची निंदनीय शरीरे सांगितलेली आहेत. त्यामध्ये अतिस्थूल शरीर हे निंद्य मानले आहे. आजच्या २१ व्या शतकात तर बैठ्या जीवनशैलीमुळे (आहाराच्या मानाने व्यायाम अल्प प्रमाणात) स्थूलतेचा शाप अनेकांना मिळालेला आहे. गरीब , कष्टकरी वर्ग वगळता अगदी कनिष्ठ मध्यमवर्गापासून ते उच्च वर्गीयांपर्यंत , नवश्रीमन्तांपर्यंत बहुतेकांना अति सकस आणि अति पौष्टिक आहारामुळे स्थूलतेचा विकार जडलेला आढळतो. गोड , थंड , तेलकट , तुपकट पदार्थांचे भरपूर सेवन , वेळी-अवेळी जेवण घेणे , अति प्रमाणात आहार घेणे , रात्री उशिरापर्यंत जड जेवण , पार्ट्या , सतत दुचाकी , चारचाकी वाहनातून प्रवास त्यामुळे व्या

जिरे

      आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातील जिरे हा पदार्थ औषधीदृष्ट्या खूप उपयुक्त आहे. जिरे हे उत्तम पाचक, रुचिकर, हलके आहेत. भूक न लागणे, अजीर्ण होणे, यावर जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मुखरोग, जिभेला फोड येणे, तोंडात चट्टे पडणे या व्याधींवर जिरे बारीक कुटून पाण्यात भिजवून नंतर त्या गाळलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात.              प्रसुतीनंतर अंगावर दूध चांगले येण्यासाठी जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण आणि गूळ एकत्र करून खावे. तोंड आले असल्यास जिरे चघळावेत. कडू जिर्‍याचा धूर केला असता डास, चिलटे, किडे पळून जातात. श्वेतप्रदर, रक्तप्रदर या स्त्रियांच्या व्याधींवर जिरे आणि खडीसाखर एकत्र करून खावी. अंगात उष्णता असल्यास जिरेपूड रोज खावी. सारखी आव पडत असल्यास जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण घ्यावे.           अंग खाजत असेल, अॅलर्जीमुळे अंगावर लाल पुरळ आले असेल तर जिरे रात्री गरम पाण्यातून घ्यावेत. पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून, अन्नपचन व्यवस्थित व्हावे म्हणून जिरे घालून उकळून गार केलेले पाणी नियमित प्यावे. दक्षिण भारतात असे जिरेयुक्त गरम पाणी भोजनापूर्वी पिण्यास देण्याची प्रथा आहे.