Posts

ब्लॉगवरील सर्व अनुयायी, वाचक, चाहते यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! ही दिपावली आपणा सर्वांना सुख, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना !

शरदाचे चांदणे २

मंडळी,            शरद ऋतूत विरेचन व रक्तमोक्षण या कर्मांबरोबरच आहारविहाराची पथ्येही पाळावी लागतात. रात्री विशेषतः जडान्न खाऊ नये. दही, क्षारयुक्त पदार्थ, बर्फ, थंड पदार्थ, जास्त खारट, आंबट, तिखट, मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत. भेळ, मिसळ, शेव, चिवडा, वडे, भजे, इडली, डोसा, पाणीपुरी आदि पित्तकारक पदार्थ खाऊ नयेत. जास्त चहा पिऊ नये. भात, ज्वारी, गहू, डाळी, द्विदल धान्ये वापरावीत.           पुरणपोळी गायीचे तूप टाकून खावी. लसूण, लोणचे पूर्णपणे बंद करावे. विविध फळे, मोरावळा, चांगले तूप खाण्यात असावे. आहार मोजकाच घ्यावा. पोटाला तडस लागेल इतके जेऊ नये.           शरद ऋतूत 'अगस्ती' ता-याचा उदय दक्षिणेला होतो. याचे माहिती आपण घेतली आहेच. अगस्ती ता-यामुळे शुद्ध झालेले पाणी या ऋतूत प्यावे. दिवसा ऊन जास्त असल्याने उन्हापासून बचाव करावा. टोपी, छत्री, गॉगल यांचा वापर करावा. अशा प्रकारे आपण आहार विहार ठेवल्यास हे शरदाचे चांदणे आपणाला निश्चितच सुखकर व आल्हाददायक वाटेल.

शरदाचे चांदणे १

          शरदाच्या चांदण्याविषयी साहित्यामध्ये विपुल माहिती आढळते. शरद ऋतूमध्ये निसर्ग मोठा सुंदर भासतो. नुकताच पावसाळा संपल्यामुळे सर्वत्र हिरवळ, फुललेली रंगीबेरंगी फुले, यामुळे सृष्टी नवचैतन्याने नटलेली असते. दिवसा आकाशामध्ये शुभ्र ढग विहार करीत असतात, तर रात्री आकाश स्वच्छ, निरभ्र असते. असे निरभ्र आकाश, चमचमत्या चांदण्या, चंद्र यामुळे पडलेले चांदणे मोठे मनोहर भासते.            या सुरुवातीच्या काळात थोडा पाऊस असतो.  परंतु जसेजसे दिवस जाऊ लागतात, तसतसा पाऊस कमी होतो. शरद ऋतूच्या उत्तरार्धात पाऊस जवळजवळ नसतोच. दिवसा हवेतील ऊष्मा वाढू लागतो. त्यामुळे उकाडा असह्य होतो. 'ऑक्टोबर हीट' म्हणतात ती हीच. रात्री मात्र टिपूर चांदणे पडते. रात्री हवाही थंड, आल्हाददायक असते. म्हणून अशा वेळी रात्री उशिरापर्यंत चांदण्यात शिळोप्याच्या गप्पा रंगायच्या. रात्री चांदण्यात गच्चीवर थंड, आल्हाददायक हवेत शांत झोप लागते. पहाटे मात्र थंडी, दव पडते. दिवसा उकाडा वाढल्याने पावसाळ्यात संचित झालेल्या पित्तदोषाचा प्रकोप शरद ऋतूत होतो.            या ऋतूत येते ती 'कोजागिरी पौर्णिमा'. रात्रीच्या व