Posts

हसा, पण लठ्ठ होऊ नका भाग- १

               या ब्लॉगची लोकप्रिय पोस्ट लोकाग्रहास्तव पुन्हा प्रकाशित करीत आहे.   ' हसा , आणि लठ्ठ व्हा ' अशा स्वरूपाची म्हण प्रचारात आहे. हसण्याचा आणि लठ्ठपणाचा कितपत जवळचा संबंध आहे हे माहिती नाही. कारण प्रख्यात विनोदवीर चार्ली चापलीन आणि आचार्य अत्रे यांची व्यक्तिमत्त्वे भिन्न होती. पण लठ्ठपणा हा अनेक रोगांचे मूळ असल्यामुळे तुम्ही भले मनसोक्त हसा , पण लठ्ठ मात्र होऊ नका.            आयुर्वेदात आठ प्रकारची निंदनीय शरीरे सांगितलेली आहेत. त्यामध्ये अतिस्थूल शरीर हे निंद्य मानले आहे. आजच्या २१ व्या शतकात तर बैठ्या जीवनशैलीमुळे (आहाराच्या मानाने व्यायाम अल्प प्रमाणात) स्थूलतेचा शाप अनेकांना मिळालेला आहे. गरीब , कष्टकरी वर्ग वगळता अगदी कनिष्ठ मध्यमवर्गापासून ते उच्च वर्गीयांपर्यंत , नवश्रीमन्तांपर्यंत बहुतेकांना अति सकस आणि अति पौष्टिक आहारामुळे स्थूलतेचा विकार जडलेला आढळतो. गोड , थंड , तेलकट , तुपकट पदार्थांचे भरपूर सेवन , वेळी-अवेळी जेवण घेणे , अति प्रमाणात आ...

जिरे

      आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातील जिरे हा पदार्थ औषधीदृष्ट्या खूप उपयुक्त आहे. जिरे हे उत्तम पाचक, रुचिकर, हलके आहेत. भूक न लागणे, अजीर्ण होणे, यावर जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मुखरोग, जिभेला फोड येणे, तोंडात चट्टे पडणे या व्याधींवर जिरे बारीक कुटून पाण्यात भिजवून नंतर त्या गाळलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात.              प्रसुतीनंतर अंगावर दूध चांगले येण्यासाठी जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण आणि गूळ एकत्र करून खावे. तोंड आले असल्यास जिरे चघळावेत. कडू जिर्‍याचा धूर केला असता डास, चिलटे, किडे पळून जातात. श्वेतप्रदर, रक्तप्रदर या स्त्रियांच्या व्याधींवर जिरे आणि खडीसाखर एकत्र करून खावी. अंगात उष्णता असल्यास जिरेपूड रोज खावी. सारखी आव पडत असल्यास जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण घ्यावे.           अंग खाजत असेल, अॅलर्जीमुळे अंगावर लाल पुरळ आले असेल तर जिरे रात्री गरम पाण्यातून घ्यावेत. पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून, अन्नपचन व्यवस्थित व्हावे म्हणून जिरे घालून उकळून ग...

करंज

Image
       करंज ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, रानोमाळ उगवते. करंजाच्या बियांपासून तेल काढतात. हे अतिशय उपयुक्त तेल आहे. करंज तेल उत्तम व्रणशोधक, व्रणरोपक आहे. हे तेल जखमेला लावतात. त्यामुळे जखम लवकर भरून येऊन नंतर व्रणही रहात नाही. जखमेत पू झाला असेल तरी हे तेल नियमित लावले असता पू कमी होऊन जखम भरते. अर्थात हे प्रयोग वैद्याच्या सल्ल्यानेच करावेत.          तसेच खरूज, नायटे, खाज, विविध त्वचेचे रोग यावर करंज तेलाचा उत्तम उपयोग होतो. सोरीयासीस, एक्झिमा या आजारांवर करंज तेल नियमित लावले असता ते आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात.          करंजाच्या झाडाच्या काड्यांचा उपयोग पूर्वी दात घासण्यासाठी करीत असत. कडूनिम्बाच्या काड्यांप्रमाणेच करंजाच्या काड्यांनीही दात स्वच्छ होतात, हिरड्या मजबूत होतात. सूज आली असता, मुका मार लागला असता तेथे पानांचा कल्क बांधावा.          करंज ही वनस्पती कृमीनाशक आहे. म्हणून पोटात जंत असल्यास पानांचा किंवा सालीचा...