धनुर्मास
धनुर्मास © लेखक- डॉ. गोपाल मेघश्याम सावकार, चेतनानगर, इंदिरानगर Annex, नाशिक फोन नं.- 8149988904, इमेल- gsawkar@gmail.com उत्तरायणातील शिशिर ऋतूत धनुर्मास येतो. सूर्याच्या धनुराशीतील वास्तव्याच्या महिन्याला धनुर्मास म्हणतात. धनुर्मासालाच धुंधुरमास , झुंझुरमास अथवा शून्यमास किंवा धन्धुर्मास असेही म्हणतात. हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्म मुहूर्त म्हणजेच देवतांची पहाट असते , असे म्हटले जाते. पंचांगातसुद्धा धनुर्मास सुरु कधी होतो आणि संपतो कधी हे दिलेले असते. त्या काळात पहाटेच्या वेळी नैविद्य दाखवून पहाटे किंवा सकाळी लवकर जेवण घेण्याची प्रथा आहे. मुगाची खिचडी , कढी , बाजरीची भाकरी , लोणी , वांग्याचे भरीत , तूप असा चविष्ट बेत या दिवसात करतात. सकाळी सकाळी भरपेट जेवण व्हावे असा हेतू त्यामागे आहे. दक्षिण भारतात धनुर्मासाचे खूप महत्त्व आहे. त्या काळात विष्णूची पूजा केली जाते. मकरसंक्रांतीच्या आधी भोगी येते. त्यादिवशीही असाच बेत करतात. भोगीची भाजीही प्रसिद्ध आहे. हरबरा, वांगे, कांदे, वाल, मेथी, वाटाणे, गाजर, खोबरे, तीळ अशी मिक्स व्हेज टाईप भाजी असते. पोपटी किंवा...