Hand Foot Mouth आजार अर्थात टोमॅटो फ्ल्यु
मंडळी , सध्या लहान मुलांमध्ये अंगावर विशेषतः हात आणि पाय यावर लाल पुळ्या येणे , त्यातून पाणी येणे , खाज येणे अशी लक्षणे असलेला आजार साथीच्या स्वरूपात पसरलेला आढळतो आहे. सध्या ' मंकी पॉक्स ' या आजाराचा बोलबाला असल्याने अनेक पालक घाबरून जाताहेत. पण पालकांनो , काळजी करू नका. या आजाराचा आणि मंकी पॉक्स या आजाराचा सबंध नाही. मंकी पॉक्स हा आजार भारतात पसरलेला नाही. सध्या लहान मुलांमध्ये दिसणारा हा आजार 'HAND, FOOT, MOUTH (HFMD)' या आजाराशी साधर्म्य दाखविणारा आजार आहे. खूप पाउस , कोंदट वातावरण , त्यानंतर लगेच कडक उन यामुळे असे आजार पसरतात. आयुर्वेदात वर्णन केलेले शीतला , रोमान्तिका आजारांच्या जातकुळीतील हाही आजार आहे. हा लहान मुलांमध्ये संपर्काने पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. यामुळे अंगावर लाल पुळ्या , त्यातून पाणी येणे , खाज येणे , अंग दुखणे , ताप येणे , काहींमध्ये भूक कमी होणे , घसा दुखणे , सर्दी , डोळे लाल होणे अशीही लक्षणे आढळतात. हा SELF LIMITING आजार आहे. हा १० ते १२ दिवसात बरा होतो. त्यामुळे घाबरू नका. सर्वप्रथम प्रतिबंधात्मक उपचार करावेत. आजार झालेल्या मुलांना ८...