Posts

Showing posts from February, 2011

कवठ (कपित्थ)

    कवठ हे वसंत ऋतूत येणारे फळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाची गूळ घालून चटणी करतात. भगवान शंकराचा प्रसाद म्हणून कवठाचे सेवन करतात. महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी श्रद्धा आहे.      दक्षिण महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाच्या वाडीला कवठाची बर्फी मिळते. अतिशय रुचकर असा हा खाद्य पदार्थ आहे. कवठाची बर्फी, चटणी अतिशय रुचकर, पित्तशामक, जिभेची चव वाढवणारी आहे. कवठ हे अम्लपित्तावर खावे. काविळीवर कवठाच्या पाल्याचा रस घ्यावा.      कवठाने आवाज चांगला होतो. कवठ खोकल्यावर गुणकारी आहे.      मात्र कच्चे कवठ खाऊ नये. चांगले पिकलेले कवठ खावे. असे हे बहुगुणी कवठ आहे.

संपर्कासाठी

मंडळी, २००० च्या वर पेज views आणि ब्लॉगला मिळणारा प्रतिसाद आणि त्यामुळे आयुर्वेदाला मिळणारा प्रतिसाद पाहून मला अतिशय आनंद झाला. अनेकांना माझ्याशी संपर्क कसा करावा हे माहीत नव्हते. त्यासाठी मी माझा इ मेल ब्लॉगवर देत आहे.  

मेथी

      मेथीची पालेभाजी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे उत्पादन खूप होते. तसेच मेथीचे बी बाजारात मिळते. या मेथीच्या बीपासून मेथीचे लाडू तयार करतात. हे लाडू हिवाळ्यात, हेमंत, शिशिर ऋतूत खातात. मेथीचे लाडू अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक असतात. मेथीची भाजीसुद्धा अतिशय  पौष्टिक असते. तुरीच्या डाळीबरोबर मेथीचे दाणे एकत्र करून त्याचे कालवण करतात. त्याला 'पेंडपालं' असे म्हणतात.       बाळन्तिणीला डिंकाचे, मेथीचे लाडू खायला देतात. प्रसूतीकाळात झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी हा आहार देतात. मेथीमुळे बाळन्तिणीच्या अंगावरचे दूधसुद्धा वाढते. तसेच गर्भाशय शोधन होते. प्रसूतीकाळात गर्भाशयात साचलेल्या, साठलेल्या दोषांचा निचरा करण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.       मेथीच्या बिया शरीरातील अतिरिक्त मेद कमी करतात. बियांचे चूर्ण नियमित घेतल्यास मेद कमी होतो. प्रमेहावर मेथीच्या बियांचा चांगला उपयोग होतो. रक्तातील साखर वाढणे, वारंवार लघवीला जावे लागणे, बैठ्या जीवनशैलीमुळे होणारा मधुमेह (टाईप २) यावर दाणामेथीचा चांगला उपयोग होतो...

कुळीथ / कुलित्थ (हुलगे)

      हिवाळा आला की शेंगोळे किंवा कुळीथाच्या जिलब्या घरोघर केल्या जातात. कुळीथाचे पिठलेही फार प्रसिध्द आहे. नाशिक, धुळे जिल्ह्यात वरील पदार्थ फार फार प्रसिध्द आहेत. ताकाबरोबर केलेले  कुळीथाचे कालवण खूपच चविष्ट लागते. कुळीथा लाच हुलगे तर संस्कृतमध्ये कुलित्थ असे म्हणतात.       कुळीथ हे अतिशय उष्ण आहेत. म्हणून कुळीथ फक्त हिवाळ्यात खातात. इतर ऋतूत त्याचा वापर करू नये. तसेच पित्तप्रकृतीच्या माणसांनी याचे जपून सेवन करावे. कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते. अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.      मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथा चा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.        पोटात वात धरणे, पोट दुखणे...