Posts

Showing posts from December, 2010

औदुंबर (उंबर)

     भगवान दत्तात्रेयांना औदुम्बराचे झाड अतिशय प्रिय आहे. औदुम्बराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचा वास असतो. दत्तजयन्तीच्या वेळी आपण औदुम्बराची पूजा करतो, त्यानिमित्ताने आपण त्याच्या अंगी असणाया गुणांची माहिती घेऊ या.     पुराणामध्येही अशी एक कथा आढळते की नरसिंव्हाने जेव्हा हिरण्यकश्यपू या राक्षसाचा पोट फाडून वध केला तेव्हा त्याच्या हाताच्या नखान्ची खूप आग व्हायला लागली. त्यावेळी त्याने आपली नखे उंबराच्या झाडात खुपसली, तेव्हा ती आग शान्त झाली. त्यातील कथेचा भाग सोडला तरी उंबर हे अतिशय थंड आहे, हे आपल्या लक्षात येते.     उंबराच्या झाडाजवळ जमिनीखाली पाणी असते, असे म्हणतात.  उंबराची साल, फळ, चीक, रस, पाने यांचा औषधात वापर करतात.     उंबर हे पित्तशामक, तसेच तहान भागविणारे आहे. अम्लपित्तावर उंबराची पिकलेली फळे साखरेबरोबर देतात. उष्णतेने अंगाची आग होत असल्यास सालीचे चूर्ण किंवा काढ्याचा उपयोग होतो. रक्तपित्त नावाच्या आजारात याचा चांगला उपयोग होतो. अंगावरून जास्त जाणे या स्त्रियांच्या विकारात फळे, साली...

हळद

चंपाषष्ठी अर्थात खंडोबाच्या उत्सवाच्या निमित्ताने हळदीचा भंडारा उधळला जातो. मणिमल्ल दैत्यांशी कडेपठारावर लढाई खेळलेल्या खंडोबाने हळदीला आपल्या आवडत्या द्रव्यात स्थान दिले ह्यात काय नवल ?  झालेल्या जखमांमधील रक्तस्राव थांबवून जखमा भरून आणणे यात हळद अत्यंत श्रेष्ठ आहे. हळदीमुळे जखमा तर व्यवस्थित भरतातच शिवाय जखमेचे व्रणही शिल्लक रहात नाहीत. 'पी हळद आणि हो गोरी' अशी म्हण तिरकस अर्थाने असली तरी त्वचेचा रंग उजळण्यात हळद सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच लग्नात आधी हळद लावण्याची प्रथा आहे. हळद अंगाला लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. त्वचा  सतेज आणि कांतिमान होते. हळदीच्या अंगी रक्तशुद्धीकरणाचा मोठा गुणधर्म आहे. हळद रक्तवर्धक  आहे. खाज, खरूज, त्वचेवर पित्त उठणे यासारख्या त्वचारोगांवर पोटातून हळद घ्यावी आणि बाहेरूनही हळद लावावी.  मधुमेहातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हळद आणि  आवळकाठी चूर्ण...

आवळा

"आवळा देऊन कोहळा काढणे" अशी म्हण प्रचारात असली तरी आवळा देणे म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती गमावणे   होय. तुळशीच्या लग्नाचे दिवस सुरु झाले की चिंचा,  बोरे, आवळे अशा  मुलांच्या आवडत्या रानमेव्याचेही दिवस सुरु होतात. आपण आई बाबा मात्र 'नको खाऊ, सर्दी खोकला होईल' म्हणून त्यांना दाटत असतो. आवळे अष्टमी ही याच दिवसात येते. आवळा हे हविष्याचे द्रव्य म्हणून ओळखले जाते. च्यवनप्राश खाऊन तरूण झालेल्या च्यवन ऋषींची हकीकत सर्वांना माहितीच आहे. आवळा हा रसायन कार्य करणारा आहे. रूढ अर्थाने शरीर तरूण बनविणे असा अर्थ निघत असला तरी शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म पेशींची झीज कमी करणे, degenerative changes कमी करणे असाही रसायन शब्दाचा अर्थ होतो. अर्थात च्यवन प्राशाच्या खपाने अनेक औषधी कंपन्या गब्बर झाल्या असल्या तरी खात्रीशीर च्यवनप्राश घ्यावा. च्यवनप्राश अनेक स्वरूपात उपलब्ध आहे. granules , chewable tabs , chocklets अश्या स्वरूपात असले तरी पारंपारिक पद्धतीने तयार केलेला जास्त परिणामकारक ठरतो. आवळा हा 'परं वृष्य' सांगितलेला आहे. च्यवनांसारख्या म्हाताऱ्...