Posts

Showing posts with the label लठ्ठ होऊ नका

हसा, पण लठ्ठ होऊ नका !

      'हसा, आणि लठ्ठ व्हा' अशा स्वरूपाची म्हण प्रचारात आहे. हसण्याचा आणि लठ्ठपणाचा कितपत जवळचा संबंध आहे हे माहिती नाही. कारण प्रख्यात विनोदवीर चार्ली चापलीन आणि आचार्य अत्रे यांची व्यक्तिमत्त्वे भिन्न होती. पण लठ्ठपणा हा अनेक रोगांचे मूळ असल्यामुळे तुम्ही भले मनसोक्त हसा, पण लठ्ठ मात्र होऊ नका.      आयुर्वेदात आठ प्रकारची निंदनीय शरीरे सांगितलेली आहेत. त्यामध्ये अतिस्थूल शरीर हे निंद्य मानले आहे. आजच्या २१ व्या शतकात तर बैठ्या जीवनशैलीमुळे (आहाराच्या मानाने व्यायाम अल्प प्रमाणात) स्थूलतेचा शाप अनेकांना मिळालेला आहे. गरीब, कष्टकरी वर्ग वगळता अगदी कनिष्ठ मध्यमवर्गापासून ते उच्च वर्गीयांपर्यंत, नवश्रीमन्तांपर्यंत बहुतेकांना अति सकस आणि अति पौष्टिक आहारामुळे स्थूलतेचा विकार जडलेला आढळतो. गोड, थंड, तेलकट, तुपकट पदार्थांचे भरपूर सेवन, वेळी-अवेळी जेवण घेणे, अति प्रमाणात आहार घेणे, रात्री उशिरापर्यंत जड जेवण, पार्ट्या, सतत दुचाकी, चारचाकी वाहनातून प्रवास त्यामुळे व्यायाम तर सोडाच साधे पायी फिरणेही नाही, सकाळी लवकरपासून ते रात्री उशिरापर्यंत कामाच्या वेळा त्यामुळे वाढलेला मानसिक तणाव अ