आला उन्हाळा, तब्येत सांभाळा !!!
आला उन्हाळा , तब्येत सांभाळा !!! नमस्कार मंडळी ! मोठा झालेला दिवस , दिवसभर असणारा उकाडा , सारखा घाम येणे , दिवसभर उत्साह न वाटणे , यामुळे उन्हाळ्याचा आपल्याला कंटाळा येतो. तर विविध शीतपेये , आईस्क्रीम , मुलांची मोठी सुटी , आमरसाच्या मेजवान्या आणि लग्नसराई यामुळे दुसरीकडे उन्हाळा हवाहवासाही वाटतो. पण या काळात आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात उन्हात जास्त हिंडू नये. उन्हाच्या वेळी बाहेर जायचे झाल्यास डोक्याला टोपी किंवा रुमाल बांधून जावे. उन्हाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्यामुळे पाणी उकळून प्यावे किंवा फिल्टर करून प्यावे. पिण्याचे पाणी उकळून नंतर वाळा , मोग्र्याची फुले असे सुगंधी पदार्थ टाकून थंड करून प्यावे. प्रकृतीनुसार ज्यांना मानवते त्यांनी थंड पाणी प्यावे. फ्रीजपेक्षा माठात थंड केलेले पाणी अधिक चांगले. आईस्क्रीम , बर्फ , कृत्रिम शीतपेये यांचा वापर शक्यतो टाळावा. त्याऐवजी थंडगार लिंबू सरबत , आमसुलाचे सरबत , कैरीचे पन्हे , शहाळ्याचे पाणी , गोड ताक , ताजी नीरा यासारख्या नैसर्गिक शीतपेयांचा भरपूर वापर वापर करण्यास हरकत ...