कापूर
'कापूर' हा अतिशय पांढरा शुभ्र असतो. तो अतिशय थंड आहे. भगवान श्री शंकर कापराच्या रंगाचे आहेत म्हणून त्यांना ‘ कर्पूरगौर ’ म्हणतात. कोणत्याही देवतेची आरती झाल्यानंतर कर्पुरारती लावण्याची प्रथा आहे. कापूर जाळला असता हवेतील रोगकारक जंतू नाहीसे होतात. कापूर उडनशील आहे. तो उघडा ठेवला असता उडून जातो. म्हणून तो बंद डब्यात ठेवावा. कापराच्या अनेक जाती आहेत.त्यात भीमसेनी कापूर श्रेष्ठ आहे. बाजारात जो सध्या कापूर मिळतो, तो अस्सल कापूर नव्हे. तो रासायनिक आहे. अस्सल भीमसेनी कापूर काष्ठौषधीच्या दुकानात मिळतो. कापूर थंड आहे. कापराचे तेल कोथ (कुजणे) नाशक आहे. वेदनाशमनासाठी कापराचे तेल वापरतात. तसेच इसबासारख्या त्वचा विकारांवर हे तेल वापरतात. कापूर डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असल्याने डोळ्यांच्या औषधात कापूर वापरतात. दाढदुखी, दात किडणे, सुजणे, दंतरोग यावर कापूर वापरतात. हल्ली लोकप्रिय झालेली विविध वेदनाशामक मलमे, औषधे, सर्दीवरील औषधे, यामध्ये कापूर असतो. कापराच्या झाडाच्या चिकाचा कापूर म्हणून...