Posts

Showing posts from March, 2015

शतावरी

                      शतावरी वनस्पतीच्या मुळ्या जास्त औषधी असतात. या मूळ्याचे चूर्ण, स्वरस, काढा औषधात वापरतात. शतावरी ही उत्तम शक्तीवर्धक आहे. एकूणच शरीराचे बल शतावरीने वाढते. अशक्तपणा, उत्साह न वाढणे, यावर शतावरीचे चूर्ण रोज दुधाबरोबर घ्यावे. त्यामुळे बलवृद्धी होऊन रोगप्रतिकारशक्तीही उत्तम वाढते. शरीरयष्टी बारीक असणे, वजन न वाढणे, यावर शतावरी चूर्ण घ्यावे.         शतावरीच्या सहाय्याने तेल, तूप सिध्द करतात. शतावरीच्या तेलाने मालीश केली असता वजन वाढते. शतावरी घृताचे नियमित सेवन केले असता बल प्राप्त होते. आम्लपित्त, घशाशी जळजळ, त्यामुळे पोटात दुखणे यावर शतावरी चूर्ण घ्यावे. तसेच अल्सरचा त्रास असल्यास शतावरी चूर्ण तुपातून घ्यावे. त्यामुळे पेप्टेक अल्सर बरा होण्यास मदत होते.           शतावरी कल्प तर प्रसिद्धच आहे. ज्या काही औषधांमुळे आयुर्वेद प्रत्येक घरात आहे त्यापैकी एक म्हणजे शतावरी कल्प. याचा मुख्य उपयोग हा सध्या प्रसुतीनंतर अंगावर नियमित व भरपूर दूध येण्यासाठी होत असला तरी तो ...

वसंत ऋतूतील काळजी

मंडळी, खास आग्रहास्तव ही पोस्ट पुन्हा देत आहोत.            वसंत ऋतु म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. सूर्याचे उत्तरायण हळूहळू या ऋतूत सुरु होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढते. शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते. वातावरणात थोडीशी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नविन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित, नवचैतन्याने नटलेली भासते. आंब्याला मोहोर येतो. सर्वत्र सुगंधित फुले फुलतात. कोकीळा कुहु कुहु कुंजन करु लागते. अशा प्रकारे सर्व सृष्टीला नवसंजीवन देणारा हा वसंत ऋतु म्हणजे ’ऋतुराज वसंत’ सुरु होतो.              वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे हिवाळ्यात निसर्गत: आणि आहार-विहारामुळे संचित झालेला कफदोष द्रवीभूत होतो, त्याचे विलयन होते. त्यामुळे या ऋतूत कफदोषाचे अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: श्वसनमार्गाचे व्याधी जास्त होतात. उदा. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखेही व्याधी होतात. या ऋतूत भुकेचे प्रमाण कमी होते. म्हणून पचायला हल...