शिकेकाई
शिकेकाई सुप्रसिद्धच आहे. शिकेकाई कुटून पाण्यात कालवून त्याच्या सहाय्याने केस स्वच्छ करतात. शिकेकाईमुळे केस स्वच्छ धुतले जातात. केसात कोंडा असेल तर शिकेकाई उपयुक्त आहे. केसांच्या विविध तक्रारी, केसांची वाढ नीट न होणे, केस गळणे, पिकणे, यावर शिकेकाई लावावी. रासायनिक शाम्पू लावण्यापेक्षा शिकेकाई वापरल्या केसांचे आरोग्य निश्चित चांगले राहाते. शिकेकाईचे पाणी अंगाला लावल्यासही अंगही स्वच्छ निघते. शिकेकाईचे पाणी पोटात जास्त प्रमाणात गेल्यास उलट्या होऊ शकतात. पोटात विष गेल्यास प्राथमिक उपचार म्हणून काही वेळा शिकेकाईचे पाणी पाजून उलट्या करवतात.