Posts

Showing posts from December, 2011

अक्कलकारा

                या वनस्पतीच्या नावातच तिचे गुणधर्म सामावलेले आहेत. मुलांना लहानपणी वडीलधारी माणसे अक्कलकारा तूप-भातात मिसळून खायला देत असत. मुलांनी लवकर बोलावे, स्पष्ट बोलावे यासाठी ते देत.  लहान मुले बोलायला शिकताना सुरुवातीला बोबडे बोलतात. पहिल्या-पहिल्यांदा या बोबड्या बोलांचे कौतुक होते. मात्र काही काही वेळा मुलाचे वय वाढत जाते, पण त्याची बोबडे बोलायची सवय काही जात  नाही. अशावेळी मुलांचे शब्दोच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून त्यांना अक्कलकारा खायला देतात. अक्कलकारा हा जिभेला चुरचुरणारा, किंचित तिखट असल्याने लहान मुले लवकर खात नाहीत. अशा वेळी युक्ती प्रयुक्तीने भातात मिसळून तूप मीठ टाकून अक्कलकारा नियमित खायला द्यावा. याच्या सेवनाने आवाज चांगला, शब्दोच्चार स्पष्ट, बुद्धी तल्लख होते.                   विविध मानसिक आजारांवर अक्कलका-याचा खूप चांगला उपयोग होतो. उन्माद, अपस्मार यासारख्या मानसिक आजारांवर याचा चांगला उपयोग होतो.               ...

आभार

             मंडळी, आपण सर्व सुजाण वाचकांनी माझ्या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादामुळे पेज व्हिव्युज हे २५००० च्या वर गेले आहेत. व्यवसायामुळे माझे अनियमित लिखाण, वाचकांच्या ई पत्राला लवकर उत्तर न देणे, ब्लॉगची साधी सरळ भाषा, ब्लॉगला सजावट नसणे, किंचित लाजाळूपणामुळे स्वत:चा उदो उदो न करणे, माझ्या या सर्व त्रुटी आपण पोटात घालून मला जो प्रतिसाद दिला, जे प्रेम दिले याबद्दल आपले शतश: आभार !              दोन बायका सांभाळणा-यांची काय हालत होत असेल हे दोन ब्लॉग चालविताना मला कळले. त्यामुळे दुस-या ब्लॉगकडे खूप दुर्लक्ष्य झाले. याबद्दल क्षमस्व !            यापुढेही आपण असाच प्रतिसाद देऊन माझा उत्साह वाढवावा ही विनंती.  

बदाम

                         सुकामेवा म्हणून बदाम प्रसिद्ध आहेत. बदाम हे अतिशय पौष्टीक आणि शक्तीवर्धक आहेत. बदामाचे तेल सुद्धा निघते. हे तेल सौंदर्यप्रसाधनांमध्ये सौंदर्यवृध्दीसाठी, त्वचा कांतिमान होण्यासाठी वापरतात. हिवाळ्यात पौष्टीक खाद्य म्हणून बदामाचा शिरा खातात. डोकेदुखी, डोके जड होणे, अर्धशिशी यावर बदाम्याच्या शि-याचा खूप चांगला उपयोग होतो.                   आयुर्वेदानुसार बदामामुळे मज्जाधातूची वृध्दी होते. बदाम हे बुध्दीच्या वाढीसाठी खातात. बुध्दीची धारणाशक्ती वाढावी, वाचलेले किंवा ऎकलेले लवकर लक्षात यावे, एकदा लक्षात राहिलेले जास्त काळ लक्षात रहावे, जास्त माहिती लक्षात ठेवण्याचे क्षमता वाढावी यासाठी बदामाचा खूप उपयोग होतो.                   बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. तसेच प्रथिने आणि स्निग्ध पदार्थही असतात. म्हणून हिवाळ्यात बदामाचे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. डिंकाच्या लाडूत बदाम घालतात. मात्र बदाम ऊष्ण व ज...