Posts

Showing posts from April, 2011

वाळा

   उन्हाळ्यात माठाच्या पाण्यात वाळा घातला असता ते पाणी थंड व सुगंधी होते. त्या पाण्याने तहान भागते. वाळ्याचे पडदे खिडक्या, दारे, गाड्या यांना लावतात. पिवळा वाळा, काळा वाळा असे वाळ्याचे दोन प्रकार आहेत.        वाळा हा अतिशय थंड आहे. अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. लघवीला आग, जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे  यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो.     मुलांचा घोळाणा फुटणे, विशेषत: उन्हाळ्यात काही मुलांना हा त्रास खूप होतो. यावर वाळ्यापासून तयार केलेले 'उशीरासव' इतर औषधांबरोबर वापरतात. घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात. त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात. त्यामुळे त्वचा टवटवीत होते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्त्राव...

कडुनिंब

     भारतीय संस्कृतीच्या नवीन वर्षाची सुरुवात कडुनिंबाच्या सेवनाने होते. नवीन वर्षाचे स्वागत तोंड गोड करून न करता कडु तोंड करण्याची प्रथा का आहे ? शरीरात संचित झालेल्या कफाचे शमन व्हावे हा त्यामागील उद्देश आहे.  गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबा ची कोवळी पाने, फुले, गूळ, आमसोल, जिरे, ओवा, सैंधव   यांची चटणी करून सकाळी अनशेपोटी खाण्याची प्रथा आहे. वर्षातून एकदा तरी ही वनस्पती खाल्ली जावी हा त्यामागील उद्देश आहे.  केवळ गुढी पाडव्याच्या दिवशी  कडुनिंबाचे सेवन न करता वसंत ऋतूत नियमित सेवन करावे.         गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी सजविण्यासाठी निंबाच्या डहाळ्या बांधतात. कडुनिंबाच्या झाडामुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. निंबाची वाळलेली पाने जाळली असता डासांचे प्रमाण कमी होते. निंबाचे झाड खूप वर्षे टिकते. त्यामुळे वातावरण निरोगी राहून सावलीही दाट मिळते.  हे झाड विशेष करून भारतीय उपखंडातच आढळते. झाड  जुने झाल्यावर त्याच्या खोडाला सुगंधी वास येतो.      त्वचारोगांवर कडुनिम्बाचा उपयोग सर्वांना माहिती आहेच...