Posts

शिशिरातील काळजी

महाराष्ट्रात सध्या शहरांचा विकास सध्या जोरात सुरु आहे. उंच इमारतिंबरोबरच रस्ते, उड्डाणपूल, यांची कामे जोरात सुरु आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे, वेगवेगळ्या कारणांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. वातावरणात उडणारी धूळ, थंडी, धुक्यामुळे धूलीकण जमिनीलगतच्या वातावरणात जास्त वेळ राहतात. तसेच सध्या शिशिर ऋतू सुरु असल्याने वृक्षांची पानगळ सुरु आहे. ही गळालेली पाने, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जाळला जातो. त्याचाही धूर वातावरणात मिसळतो. हे धुलीकण, धूळ, धूर श्वासोच्छ्वासावाटे फुफ्फुसात, नाकात, जाऊन त्यामुळे विविध आजार होऊ शकतात. रस्त्यावरील खड्डे, खाचखळगे यामुळे मानदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार होऊ शकतात. असलेले आजार वाढतात. धूळ, धूर यामुळे असात्म्यताजन्य विकार बळावतात. सर्दी, शिंका, घसा दुखणे हे आजार होतात. दमा असल्यास दम्याचा वेग तीव्र होतो. लहान मुलांनाही याचा त्रास होतो. डोळ्यात कचरे जाणे, धूळ जाणे, डोळे लाल होणे, पाणी येणे असे डोळ्यांचेही आजार होतात. यावर पुढील काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतील. सर्दी, शिंका, खोकला-   धूर, धुळीमुळे प

नववर्षाभिनंदन

सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नाचणी

         नाचणीलाच ‘नागली’ असेही म्हणतात. नागलीचे पापड प्रसिद्धच आहेत. नाचणीची भाकरी, आंबील करतात. नाचणीचे सत्त्वही लोकप्रिय आहे.         नाचणी ही हलकी, पौष्टिक, बलदायक, थंड, भूक भागविणारी आहे.         नाचणीचे सत्त्व विशिष्ट पद्धतीने काढतात. नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी पाण्यातून काढावी. नंतर बारीक वाटावी. म्हणजे त्यातून दुधासारखे पाणी निघेल. ते पाणी गाळून कढईच्या भांड्यात स्थिर ठेवावे. हळूहळू नाचणीचे सत्त्व भांड्यात तळाशी जमा होईल. नंतर वरचे पाणी काढून टाकावे. तळाशी साचलेले सत्त्व वाळवून वापरावे. हे सत्त्व पचायला हलके, पौष्टिक, शक्तीवर्धक आहे. विशेषत: मधुमेही रुग्णांमध्ये नाचणीच्या सत्त्वाचे पदार्थ द्यावेत.        नाचणीच्या भाकरी, नाचणीचे पदार्थ खाल्ले असताही मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित रहाते.   नाचणीचे पापड याच गुणांचे आहेत, म्हणून पचायला हलके आहेत.        वजन कमी करण्यासाठीही नाचणीचे पदार्थ खावेत. अशक्तपणा न येता वजन कमी होते.

दिवाळीच्या शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या आरोग्यपूर्ण हार्दिक शुभेच्छा !!!  

नारळ

             आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळास फार महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळाने होते. प्रेमाने (?) रवानगी करायची असेल तरी नारळ   दिला जातो. नारळाची भेट, नारळाचा प्रसाद हे प्रेमाचे द्योतक आहे. नारळाशिवाय पूजेची सुरुवात होत नाही. सुवासिनीची कोठेही जाताना आनंद प्रसंगी किंवा मंगल प्रसंगी नारळाने ओटी भरणे शुभ मानले जाते. नारळाचे संपूर्ण झाड उपयुक्त आहे. नारळाला कल्पवृक्ष मानले आहे. नारळाचे खोबरे, तेल, नारळाचे दूध, नारळातील पाणी याचे खूप उपयोग आहेत. नारळाच्या करवंटीचाही उपयोग होतो. पानांपासून खराटा, झाडू करतात.         नारळ पचायला थोडे जड आहे, तसेच स्निग्ध, थंड, बलदायक, कफवर्धक, गोड, तहान व पित्तनाशक आहे. कोणत्याही कारणाने अवयव मुरगळला असेल, स्नायू दुखावला असेल तर नारळाचा किस, हळद यांचे मिश्रण गरम करून शेकल्यास ठणका, सूज याला आराम पडतो. नारू, गजकर्ण यावरही याचा उपयोग होतो. नारळाचे तेल केसवर्धक, त्वचा मऊ करणारे आहे. त्वचेच्या सुरकुत्या, डाग, यावर ओल्या खोब-याचे ताजे तेल लावावे.        उचकी, वांती यावर शहाळ्याचे पाणी व वेलदोडे एकत्र दिल्यास उपयोग होतो