Posts

Showing posts with the label धोतरा

धोतरा

Image
          धोतरा ही अतिशय विषारी वनस्पती आहे. पण योग्य मात्रेत, योग्य वेळी, आणि तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने औषधात वापरला असता गुणकारी ठरतो.           याचा उपयोग प्रामुख्याने ‘दमा’ या व्याधीत होतो. दम्यात श्वासवाहिन्यांचा व्यास कमी झालेला असतो. त्यामुळे प्राणवायूचा पुरेसा पुरवठा शरीराला होत नाही. अशा वेळी धोत-याचा वापर केला असता श्वासवाहिन्या मोकळ्या होतात. तसेच साठलेल्या कफाचा नाश होऊन दमा दूर होतो. धोत-याच्या पानांची नुसती धुरी घेतली तरी दम्याची लक्षणे लगेच कमी होतात.          यापासून कनकासव करतात. तसेच त्रिभुवनकीर्ती या प्रसिध्द औषधात धोत-याचा वापर करतात. म्हणून ही औषधे घेताना वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. विशेषत: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी धोत-याचा जपून वापर करावा.           धोत-याच्या काळा आणि पांढरा   अशा दोन जाती आहेत. काळा धोतरा जास्त गुणकारी आहे. खोकला, कफ यावर धोत-याचा खूप उपयोग होतो.