Posts

Showing posts with the label दुर्वा

दुर्वा

     मंडळी, गणरायांचे आगमन घरोघरी झाले असेल. गणपतीला सर्वात प्रिय वनस्पती म्हणजे दुर्वा. गणपतीचे दिवस आले की आपण दुर्वांच्या शोधात बाहेर पडतो. दुर्वा ह्या स्त्रियांच्या गर्भाशयाचे उत्तम टोनिक समजल्या जातात. गर्भाशयाला बलकारक, गर्भपोषणासाठी उपयुक्त तसेच गर्भाशयाची आणि गर्भाची वाढ चांगली व्हावी म्हणून दुर्वांचा खूप उपयोग होतो. मासिक पाळीच्या समस्यांवर दुर्वांचा रस पोटात घ्यावा.          नाकातून घोळाणा फुटत असल्यास दुर्वांचा रस नाकात पिळावा. दुर्वा ह्या थंड आणि तहान भागविणाऱ्या आहेत. जखमेतून रक्तस्त्राव होत असून तो लवकर थांबण्यासाठी दुर्वांचा रस लावावा.        लघवीला आग होणे, लघवी कमी होणे, कळ लागून लघवी होणे, लघवी साफ न होणे या सर्व लघवीच्या विकारांवर दुर्वांचा रस घ्यावा.       डोळे येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, यावर दुर्वांच्या रसाचे थेंब डोळ्यात टाकावेत, पोटातही घ्यावेत.       उलट्या होत असल्यास तांदूळ धुतलेल्या पाण्यात दुर्वांचा रस घालून प्यावा. सारखी उचकी लागत असल्यास दुर्वांच्या मुळांचा रस आणि मध एकत्र करून प्यावे.       अंगाची आग होणे, उष्णतेजवळ काम केल्याने त्वचा ला